The Earth Shot पुरस्कार

The Earth Shot पुरस्कार – 

  • 8 ऑक्‍टोबर 2020 रोजी ब्रिटनच्या राजकुमार विल्यम (व केंब्रिजचे ड्यूक ) यांनी पर्यावरणवादी सर डेव्हिड ॲटनबरो यांसोबत Earth Shot पुरस्काराचे उद्‌घाटन केले.
  • पुढील 10 वर्षांसाठी पृथ्वीच्या वातावरणातील दुरुस्ती करण्याचे बदल सुचवणे ,त्यांना चालना देणे व त्यांना समर्थन करण्यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
  • अर्थशॉट पुरस्काराचा  इतिहासातील सर्वाधिक प्रतिष्ठित जागतिक पर्यावरण पुरस्कार म्हणून वर्णन केले आहे.
  • अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी 1960 च्या दशकात चंद्रावर मानवाला पोहचवण्यासाठी व त्यासाठी तंत्रज्ञानातील सुधारणांसाठी चालू केलेल्या moon shot पुरस्कारावरून त्यास प्रेरित केले आहे.

Earthshot पुरस्काराबद्दल –

  • यामध्ये येत्या 10 वर्षांत दरवर्षी प्रत्येकी 1 दशलक्ष पौंडच्या (सुमारे 9.5 कोटी रु.) 5 पुरस्कारांचा समावेश आहे.
  • 5 पुरस्कार विषय
  1. निसर्गाचे संरक्षण व पुन:स्थापना करणे.
  2. हवा स्वच्‍छ करणे.
  3. महासागर पुनरुज्जीवित करणे.
  4. कचरा कमी करणे.
  5. हवामानात दुरुस्ती करणे.
  • 2030 पर्यंत पर्यावरण विषयावर कमीत कमी 50 उपाय पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.
  • बक्षिसाचे नामांकन 1 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होऊन विजेत्यांची घोषणा लंडन येथे 2021 होईल.
  • Bloomberg Philanthropies, Jack Ma Foundation (अलिबाबा), Paul G. Allen family foundation (मायक्रोसॉफ्ट) यांचे या पुरस्काराला समर्थन आहे.

डेव्हिड ॲटनबरो बद्दल –

  • पर्यावरणवादी प्रसारक – BBC Natural History Unit व 9 natural history documentaries साठी प्रसिद्ध
  • 2020 documentary – A life on our planet.

Contact Us

    Enquire Now