RBI ने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या जाणाऱ्या अतिरिक्त बाजारपेठेची टाइमलाईन 6 महिन्यांनी वाढवली

RBI ने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या जाणाऱ्या अतिरिक्त बाजारपेठेची टाइमलाईन 6 महिन्यांनी वाढवली.

  • एप्रिल 2020 मध्ये, RBI ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोविड संकटांना सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त लवचिकता प्रदान करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशासाठी वेज, WMA मर्यादा आणि ओव्हरड्राफ्ट नियमांमध्ये वाढ केली.
  • आता राज्य सरकारांना आर्थिक अडचणीतून मुक्त करण्यासाठी RRB ने या कालावधीत सहा महिन्यांची म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ केली.
  • RBI ने ओव्हरड्राफ्टमध्ये 14 ते 21 कामकाजी दिवस सतत वाढविण्याचा निर्णय घेतला, तसेच राज्य / केंद्रशासित प्रदेश ज्या तिमाहीत ओव्हरड्राफ्टमध्ये जाऊ शकतात अशा दिवसांची संख्या 36 पासून 50 कार्यकारी दिवसांपर्यंत वाढविण्यात आली.

बेसल – 3 :

  • डिसेंबर 2010 मध्ये जागतिक आर्थिक संकटातून जग सावरत असताना BCBS ने बेसल 3 निकष जाहीर केले. बेसल 2 निकषात मांडलेल्या आधारस्तंभांना अधिक बळकटी देण्यात आली.
  • बेसल 3 निकषाने पत जोखीम, बाजार जोखीम आणि क्रियात्मक जोखीम विचारात घेतली.
  • बेसल-3 निकषांनी या व्यतिरिक्त आणखी दोन जोखमी विचारात घेतल्या. त्या म्हणजे तरलता जोखीम (Liquid Risk) आणि तरफ गुणोत्तर  विचारात घेणारी प्रतिमान जोखीम (Model Risk). यामुळे आता बेसल 3 निकष पाचही प्रकारच्या जोखमी विचारात घेते.
  • बेसल 3 निकष  2013 पासून लागू करून 2015 ही कालमर्यादा ठरविण्यात आली. परंतु BCBS ने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार ही कालमर्यादा आधी 31 मार्च 2018 आणि नंतर 31 मार्च 2019 अशी करण्यात आली. 
  • बेसल-3 निकषांनी ‘रोधक भांडवल’ (Capital Conservation Buffer) ही नवीन संकल्पना सुचविली आहे. बेसल-3 निकषांनुसार जोखीम भारित संपत्तीच्या 2.5% रोधक भांडवल असले पाहिजे.

अलिकडील संबंधित :

  • 3 मे 2020 रोजी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँक बंद झाल्यानंतर RBI ने बँकिंग व्यवसाय करण्यासाठी मुंबई येथे असलेल्या 105 वर्षे जुन्या CKP सहकारी बँक लिमिटेडला दिलेला परवाना रद्द केला.
  • बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या कलम 56 मधील प्रभाग 5 (ब) मध्ये नमूद केल्यानुसार ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे.

RBI बद्दल : 

मुख्यालय – मुंबई

स्थापना : 1 एप्रिल 1935, राष्ट्रीयीकरण – 1 जानेवारी 1949 

गव्हर्नर : शक्तिकांत दास

डेप्युटी गव्हर्नर्स : बिभू प्रसाद कनुंगो, महेशकुमार जैन, मायकेल डिबाब्राता पात्रा

आर्थिक वर्ष – 1 जुलै ते 30 जून

Contact Us

    Enquire Now