PM – KISAN योजनेत 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1344 कोटी

PM – KISAN योजनेत 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1344 कोटी

  • पंतप्रधान किसान मदत निधी योजनेत 20.48 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1344 कोटी रुपये मिळाले असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये लागू केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.
  • ही योजना लघु व मध्यम शेतकरी व ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना लागू करण्यात आली होती.
  • कॉमनवेल्थ ह्यूमन राईट्‌स इनिशीएटिव्ह या संस्थेचे माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी याविषयी मंत्रालयाला प्रश्न विचारला होता.
  • या अपात्र शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी पंजाबमधील (14.74 लाख) होते त्यानंतर आसाम (3.45 लाख) व महाराष्ट्र (2.86 लाख) या राज्यांचा क्रमांक आहे.

Contact Us

    Enquire Now