OECD देशांमध्ये स्थलांतर करण्यात भारत दुसरा

OECD देशांमध्ये स्थलांतर करण्यात भारत दुसरा

  • 19 ऑक्‍टोबर 2020 रोजी आर्थिक सहकार व विकास संघटने (OECD)चे सरचिटणीस ‘जोस एंजेल गुरिया ट्रेव्हिनो’ यांनी आंतरराष्ट्रीय स्थलांतर दृष्टीकोन – 2020 (International migration outlook-2020) ची 44वी आवृत्ती जाहीर केली.
  • यामध्ये चीनचा क्रमांक अव्वल असून भारताने दुसरा क्रमांक पटकावला आहे. (रोमानिया = 3rd)
  • एकूण स्थलांतरित होणाऱ्यांची व त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांची संख्या यामध्ये गणली जाते.
  • OECD देशांत एकूण स्थलांतरितांची संख्या 66 लाख आहे. जी मागच्या वर्षापेक्षा 3.8% नी वाढली आहे.
  • 2018 मध्ये एकूण स्थलांतरितांपैकी 6.5% म्हणजेच 4.3 लाख लोक चीन देशाचेच आहेत.
  • भारताने रोमानियाला मागे टाकले आहे. ज्यात एकूण स्थलांतरितांची संख्या 3.3 लाख झाली. म्हणजेच OECD देशांच्या एकूण स्थलांतरितांपैकी 5% स्थलांतरित भारतीयच आहेत.
  • स्थलांतरामध्ये भारतीयांनी नागरिक बनण्यासाठी मुख्यत: अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांना प्राधान्य दिले.
  • COVID-19 महामारी काळात OECD देशांमध्ये नवीन व्हिसांच्या संख्येत (2019 च्या तुलनेत) 2020 मध्ये पहिल्या सहामाहीत 42%ने घट झाली आहे.

आर्थिक सहकार व विकास संघटना (Organisation for Economic Co-operation and Development) –

  • सदस्य देश – 37
  • मुख्यालय – पॅरिस (फ्रान्स)

Contact Us

    Enquire Now