GDP भारताच्या विकास दरात ऐतिहासिक २३.९% ची घसरण

GDP भारताच्या विकास दरात ऐतिहासिक २३.९% ची घसरण

  • सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय (MOSPI) अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSU) एप्रिल-जून या तिमाहीसाठी GDP ची आकडेवारी जाहीर केली.
  • कोविड-१९ महामारीमुळे व्यवसाय व राहणीमान ठप्प पडल्याने भारताच्या GDP मध्ये २३.९% ची घट वर्तविली आहे. म्हणजेच भारताच्या Real GDP मध्ये २६.९ लाख कोटी रु. व Nominal GDP मध्ये ३८.०८ लाख कोटींची घट झाली.
  • जूनमधील आकडेवारीनुसार ही घसरण स्वातंत्र्यापासूनची सर्वाधिक आहे.
  • कोविड-१९ महामारीमुळे भारतातील आलेली ही मंदी एकूण चौथी व उदारीकरणानंतरची पहिली आहे.
  • १९९७-९८ पासून त्रैमासिक आकडेवारी प्रसिद्ध केल्यापासूनची ही पहिलीच वेळ आहे.
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार जागतिक अर्थव्यवस्था कोविड-१९ मुळे २०२० मध्ये ४.९% ने घसरेल.
  • सरकारने खर्च केला नसता तर GDP आणखी संकुचित झाला असता म्हणून सरकारी खर्चात १६.४% वाढ झाली.
  • NSO च्या वार्षिक नियतकालिक कामगार बल सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey) नुसार भारताचा बेरोजगारीचा दर जून २०१९ ला ६.१% होता.

स्थूल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product)

  • GDP मोजताना १ आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत कमावलेले उत्पन्न अथवा उत्पादित वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात.
  • भारताचे आर्थिक वर्ष – १ एप्रिल – ३१ मार्च
  • चालू वर्षातील किमतीनुसार GDP मोजल्यास त्याला Nominal GDP म्हणतात.
  • आधारभूत वर्षातील स्थिर किमतीनुसार GDP मोजल्यास त्याला Real GDP म्हणतात.
  • सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय (MOSPI) 
  • राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) – राव इंदरजित सिंग
  • सचिव – प्रवीण श्रीवास्तव

Contact Us

    Enquire Now