ARIIA – २०२१ क्रमवारी

ARIIA – २०२१ क्रमवारी

  • २९ डिसेंबर २०२१ रोजी २०२१ ची ARIIA (Atal Ranking of Institutions of Innovation Achievements) क्रमवारी शिक्षण मंत्रालयाने जाहीर केली. (तिसरी आवृत्ती)
  • सुरुवात – २०१९
  • शिक्षण मंत्रालय आणि आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम चालवला जातो.
  • तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन श्रेणींमध्ये क्रमवारी जाहीर करण्यात येते.

क्रमवारी

तांत्रिक श्रेणी (५)

अ) राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था, केंद्रीय विद्यापीठे

१) IIT मद्रास (सलग तिसऱ्यांदा अव्वल)

२) IIT बॉम्बे

३) IIT दिल्ली

ब) सरकारी अनुदानित विद्यापीठ

१) पंजाब विद्यापीठ

क) सरकारी अनुदानित महाविद्यालय

१) कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे

ड) खासगी विद्यापीठ

१) कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, ओदिशा

इ) खासगी विद्यालय – रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग नागपूर

गैर-तांत्रिक संस्था

अ) राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था, केंद्रीय विद्यापीठे

१) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU)

ब) इतर

१) भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद

मूल्यांकनाचे मापदंड

  • ARIIA संस्थांचे मूल्यमापन खालील मापदंडांवर करते.

१. नवकल्पना निर्मिती, जागरूकता, प्रचार समर्थन

२. नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रम

३. बौद्धिक संपदा निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि व्यापारीकरण

४. संस्थेच्या कामात नवोपक्रम

५. पायाभूत सुविधा

क्रमवारीचे महत्त्व

  • या क्रमवारीमुळे संस्थांना उच्च दर्जाचे संशोधन नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची प्रेरणा मिळेल.
  • नवीन शैक्षणिक धोरण २०२० ला अधिक प्रभावी आणि कार्यक्रम बनवण्यास मदत होईल.

Contact Us

    Enquire Now