AIIB च्या गव्हर्नर बोर्डाची पाचवी वार्षिक सभा व्हर्च्युअली पार पडली : जिन लिकुन यांची अध्यक्षपदी पुनर्निवड

AIIB च्या गव्हर्नर बोर्डाची पाचवी वार्षिक सभा व्हर्च्युअली पार पडली : जिन लिकुन यांची अध्यक्षपदी पुनर्निवड

  • २८ जुलै २०२० रोजी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सची पाचवी वार्षिक बैठक व्हर्च्युअली बीजिंग येथे पार पडली.
  • या बैठकीत जिन लिकून यांची AIIB अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आणि ‘AIIB-२०३०-पुढच्या दशकात आशियाच्या विकासास सहाय्य’ या थीमवर गोलमेज चर्चा झाली. विशेष म्हणजे भारताच्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन या आघाडीच्या प्रवक्त्या होत्या.
  • कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व्हर्च्युअली करण्यात आलेली ही पाचवी वार्षिक बैठक AIIB साठीची प्रथम व्हर्च्युअल बैठक ठरली.
  • बैठकीत जगभर पसरलेल्या कोविड-१९ साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारतासह सर्व देशांना AIIB ने १० अब्ज डॉलर्सची मदत केल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. 
  • या बैठकीत जिन लिकुन यांची १६ जानेवारी २०२१ पासून सुरू होणार्‍या दुसर्‍या पाच वर्ष कार्यकालासाठी नियुक्ती झाली. 
  • अध्यक्ष जिन यांच्या नेतृत्वात हे AIIB ची सदस्य संख्या ५७ संस्थापक सदस्यांपासून १०३ स्वीकृत सदस्यांपर्यंत वाढली आहे.
  • AIIB ची सहावी वार्षिक सभा २७-२८ ऑक्टोबर २०२१ दुबई संयुक्त अरब अमिराती येथे होणार असल्याचेही ठरविण्यात आले.
  • संयुक्त अरब अमिराती AIIB चा संस्थापक सदस्य देश आहे.

AIIB (Asian Infrastructure Investment Bank) :

  • AIIB ची स्थापना २०१४ साली झाली असून तिचे मुख्यालय बीजिंग (चीन) येथे आहे.
  • या बँकेत सर्वाधिक वाटा हा चीनचा असून त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो.

Contact Us

    Enquire Now