महाराष्ट्र दिन गुजरात दिन

महाराष्ट्र दिन गुजरात दिन

 • महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना तत्कालीन ‘मुंबई’ राज्यातून १ मे १९६० रोजी झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन तर गुजरातमध्ये गुजरात दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
 • स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. (संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापना ६ फेब्रुवारी १९५६)
 • मराठी भाषकांची मागणी मान्य न करता ७ ऑगस्ट १९५६ रोजी मराठी व गुजराती लोकांना एकत्रित अशा द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. यशवंतराव चव्हाण हे द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
 • १९५६ मध्ये मुंबई येथे मराठी आंदोलकांवर आंदोलन उधळून लावण्यासाठी गोळीबार करण्यात आला आणि या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मा झाले.
 • शेवटी १९६०च्या एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषावार प्रांतरचनेस मंजुरी दिली आणि मुंबई पुनर्रचना कायदा, १९६० मंजूर केला.
 • मुंबई पुनर्रचना कायदा, १९६० मधील तरतुदीनुसार द्वैभाषिक मुंबई राज्याचे १ मे १९६० पासून महाराष्ट्र व गुजरात असे दोन भाग करण्यात आले. त्यावेळी ४ प्रमुख भाग व २६ जिल्हे महाराष्ट्रात होते.
 • महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणण्यात आला. मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंडित नेहरूंच्या हस्ते १ मे १९६० रोजी कामगार दिनी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली.
 • संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ सुपुत्रांचे ‘हुतात्मा स्मारक’ मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले.
  महाराष्ट्र दिनी या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते.

Contact Us

  Enquire Now