2020 मध्ये बॅकांची 67 हजार काेटीची फसवणूक

2020 मध्ये बॅकांची 67 हजार काेटीची फसवणूक

  • केंद्रीय गुप्तचर खात्याने वर्ष 2020 साठी अहवाल जाहीर केला, या अहवालानुसार 2020 मध्ये केंद्रीय गुप्तचर खात्याकडे 543 प्रकरणे आली.
  • त्यातील 196 प्रकरणे बँकांच्या फसवणुकीची होती.
  • 2020च्या फसवणुकीची एकूण रक्कम 67 हजार 319.40 कोटी रुपयाची होती, तर 2019 मधील फसवणुकीची रक्कम 19 हजार 830.14 कोटी होती.
  • केंद्रीय गुप्तचर खात्याने बँक फसवणुकीचे 50 पेक्षा जास्त प्रकरण नोंदवले आहेत, त्यापैकी 30 प्रकरणे मुंबईतील आहेत.
  • पुणे, नागपूर, चेन्नई – 17 प्रकरणे नोंदवली आहेत.
  • 2020 या वर्षात कोरोना विषाणूची महामारी सुरू झाल्यामुळे, लॉकडाऊन लागला होता आणि इतर निर्बंधही होते तरीपण आर्थिक फसवणुकीला आळा बसलेला नाही.
  • लॉकडाऊनमध्ये बँकांच्या फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले आहे.
  • 2017 मध्ये आर्थिक फसवणुकीचे जे प्रकरण घडले त्यात बँक फसवणुकीचे प्रमाण 3% होते.
  • 2020 मध्ये हे प्रमाण 36 टक्क्यांवर पोहोचले आहे.
  • 2020 च्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात मोठे व लक्षवेधी होते, यस (YES) बँक, डीएचएफएल (DHFL), आरकेडब्लू (RKW) डेव्हलपर्स टीडीपीचे नेते रायापाती सदाशिव राव यांच्याशी संबंधित ट्रान्सट्रोयचे 7 हजार 926.01 कोटी रु. आणि एज्युकोम्प सोल्यूशन्सचे 1 हजार कोटी 995 कोटी रुपयांचे.

केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation CCBI)

स्थापन – 1 एप्रिल 1963 (संथानम समितीच्या शिफारसीने – 1963)

मुख्यालय – दिल्ली

ही भारत सरकारची विशेष पोलिस आस्थापना, गुन्हे अन्वेषण विभाग व गुप्तहेर खाते आहे.

Contact Us

    Enquire Now