1983 च्या विश्वविजेतेपदाचे शिलेदार यशपाल शर्मा कालवश
जन्म – 11 ऑगस्ट, 1954
मृत्यू – 13 जुलै, 2021
- 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या विश्वविजेतेपदाचे शिलेदार आणि मधल्या फळीतील निर्भीड फलंदाज यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- निर्भीड वृत्ती हे त्यांच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य होते.
- रणजी क्रिकेटमध्ये यशपाल यांनी पंजाब, हरियाणा आणि रेल्वे या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले.
- त्यात त्यांनी एकूण 160 सामन्यांत 8933 धावा केल्या. यांमध्ये 21 शतकांचा समावेश असून 201 नाबाद ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.
- काही महिला एकदिवसीय सामन्यांत पंच म्हणून यशपाल यांनी जबाबदारी सांभाळली.
- उत्तर प्रदेश रणजी संघाचे प्रशिक्षकपदही त्यांनी भूषविले.
- यशपाल यांनी 2000 मध्ये बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यत्वाची जबाबदारी सांभाळली.
- याच समितीने 2004 मध्ये महेंद्रसिंह धोनीला प्रथमच संधी दिली होती.
- 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघाची निवड करणाऱ्या निवड समितीतही त्यांचा समावेश होता.
- तसेच, यशपाल यांनी दूरचित्रवाणीसाठी विश्लेषकाची भूमिकाही निभावली.
यशपाल यांचे आंतरराष्ट्रीय करिअर
- भारताकडून यशपाल शर्मा यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये 1606 धावा केल्या आहेत.
- यात 140 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 42 सामन्यांत 28.48 च्या सरासरीने 883 धावा केल्या.
- दोन्ही प्रकारांत त्यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला होता.