ॲन्टोनियो गुटेरस यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसपदी फेरनिवड

ॲन्टोनियो गुटेरस यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसपदी फेरनिवड

  • जगातील सर्व राष्ट्रांची संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसपदी ॲन्टोनियो गुटेरस यांची फेरनिवड करण्यात आली.
  • गुटेरस हे राष्ट्र संघाचे नववे सरचिटणीस.
  • तिघांचा अपवाद वगळता सहा सरचिटणीसांना दोनदा हे पद भूषविण्याची संधी मिळाली.
  • १९९२ ते २००२ या काळात पोर्तुगालमधील सोशालिस्ट पक्षाचे ते सरचिटणीस होते.
  • १९९५ मध्ये पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती.
  • पंतप्रधानपदाच्या करकीर्दीत पोर्तुगालची अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर दिला होता.
  • २००५ ते २०१५ या काळात संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्वासितांच्या प्रश्नावर उच्चायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
  • एखाद्या राष्ट्राच्या निषेधाचा ठराव करण्यापलीकडे वांशिक, धार्मिक किंवा अन्य कोणत्याही हिंसाचारात संयुक्त राष्ट्र संघाला हस्तक्षेप करता आलेला नाही.
  • १९९९ ते २००५ या काळात त्यांनी ‘सोशालिस्ट इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते.
  • जेरूसलेम शहराला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध करण्यापासून अनेक घटनांवर गुटेरस यांनी भाष्य केले आहे.
  • गुटेरस यांची निवड झाल्याने संयुक्त राष्ट्रांची सध्याची धोरणे यापुढेही कायम राहतील.

Contact Us

    Enquire Now