८० हजारापेक्षा जास्त रोहिंग्यां निर्वासितांना दुर्गम बेटावर पाठवण्याची योजना

८० हजारापेक्षा जास्त रोहिंग्यां निर्वासितांना दुर्गम बेटावर पाठवण्याची योजना

  • बांग्लादेश सरकार ८० हजारांपेक्षा जास्त रोहिंग्या निर्वासितांना दुर्गम बेटावर पाठवण्याची योजना करत आहे.
  • बांग्लादेशच्या मुख्य भूमीपासून दक्षिणेस सहा किमी अंतरावर असणाऱ्या भसन चार (Bhasana Char) म्हणजेच ‘तरंगते बेट’ या बेटावर निर्वासितांना पाठविण्यात येणार आहे.
  • २००६ साली तयार झालेल्या या बेटावर निर्वासितांना पाठवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची मदत बांग्लादेश घेणार आहे.
  • ६.७ किमी वर्ग क्षेत्रफळाचा हा प्रकल्प असून यामध्ये १२ इमारतीचा एक प्रकल्प आणि प्रत्येकी एक आपत्तीच्या काळातील आश्रयगृह असणार आहे.

कोण आहे रोहिंग्या

  • ‘रोहिंग्या’ ही मुस्लिम जमात ब्रह्मदेश (आताच्या म्यानमार) मध्ये गेल्या अनेक शतके राहत आहे.
  • १९४८ मध्ये ब्रह्मदेश स्वतंत्र झाल्यापासून या जमातीला अत्याचारांचा सामना करावा लागत आहे.
  • १९८२ साली म्यानमार सरकारने नागरिकत्वाचा कायदा मंजूर केला. त्यामध्ये या रोहिंग्यांचा नागरिकत्वाचा अधिकार डावलला.
  • ९० टक्क्यांहून अधिक असणाऱ्या बौद्ध धर्मियांकडून मोठ्या प्रमाणावर अत्याचार या अल्पसंख्यांक रोहिंग्यांविरूद्ध करण्यात आले.
  • जून २०१६ मध्ये उसळलेल्या दंगलीत १५० हून अधिक रोहिंग्ये मृत्यूमुखी पडले तर दीड लाखांपेक्षा अधिक रोहिंग्यांना देश सोडावा लागला.
  • या दंगलीला सरकारचा पाठिंबा असल्याचे मानले जाते.
  • यातील बहुतेक निर्वासित सागरी मार्गांनी विविध देशांमध्ये दाखल झाले.
  • या निर्वासितांची संख्या सर्वाधिक बांग्लादेशात असून भारतातदेखील या निर्वासितांनी प्रवेश केला.
  • मानवी अधिकाराचा जागतिक जाहिरनामा (UDHR) आणि निर्वासित
  • १९४८ साली संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या UDHR मध्ये प्रत्येक मानवाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांची चर्चा केली आहे. त्यातील कलम १४ अनुसार आपल्या देशातील छळापासून सुटकेसाठी इतर देशात आश्रय मिळवण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. मात्र या निर्वासितांना अजूनही आश्रय नाकारला जात आहे.

Contact Us

    Enquire Now