२४ जुलै : राष्ट्रीय आयकर दिन

२४ जुलै : राष्ट्रीय आयकर दिन

  • भारतात दरवर्षी २४ जुलै हा आयकर दिवस (Income Tax Day) म्हणून साजरा केला जातो.
  • हा दिवस साजरा करण्यास २०१० पासून सुरुवात करण्यात आली.
  • २०१० मध्ये इन्कम टॅक्सला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. आयकर भरण्याचे महत्त्व आणि याबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात २४ जुलै १८६० मध्ये सर जेम्स विल्सन यांनी केली.

आयकर म्हणजे काय?

  • उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजे आयकर.
  • भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टातील केंद्र सूचीतील विषय क्रमांक ८२ नुसार कृषी उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावर केंद्र आयकर आकारते.
  • केंद्र सरकार आकारत असलेल्या आयकरासाठी सध्या आयकर कायदा १९६१ लागू आहे.
  • आयकर हा प्रत्यक्ष कराचा प्रकार आहे. जेव्हा कराघात आणि कर भरण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवर पडते तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात.

Contact Us

    Enquire Now