हरियाणा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार अध्यादेश २०२० मंजूर

हरियाणा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार अध्यादेश २०२० मंजूर

  • मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटमध्ये हा अध्यादेश मसुदा मंजूर करण्यात आला. ज्यात स्थानिक उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपयांपेक्षा कमी पगार देणार्‍या खासगी क्षेत्रातील कंपनी, संस्था इत्यादींमध्ये ७५% जागा राखीव ठेवण्यात आल्या. 
  • १० पेक्षा जास्त उमेदवार असलेले रोजगार या कायद्यांतर्गत येतील. 
  • हरियाणा मंत्रिमंडळासमोर हा अध्यादेश पुढच्या बैठकीदरम्यान मांडण्यात येईल. 

या कायद्यांतर्गत 

  • कंपनींना ५० हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या उमेदवाराची नोंद करावी लागेल. नोंदणी न केल्यास २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. 
  • या कायद्यासाठी जननायक जनता पार्टीचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते. 

अशा प्रकारचा कायदा : 

  • आंध्रप्रदेशमध्ये – ७५% राखीव जागा व 
  • महाराष्ट्रात – ५०% राखीव जागा – पर्यवेक्षी जागेवर 
  • ८०% राखीव जागा – पर्यवेक्षी नसलेल्या जागेसाठी.

Contact Us

    Enquire Now