स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, २०२१

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, २०२१

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २० नोव्हेंबर २०२१ रोजी स्वच्छ भारत अभियान-शहरी २.० चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवामध्ये भारतातील स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला.
  • सलग पाचव्या वर्षी इंदूरला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित करण्यात आले.
  • ४.२ कोटी लोक सर्वेक्षणात सहभागी झाले.

श्रेणीनिहाय स्वच्छ शहर पुरस्काराचे मानकरी

अ) एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे : (१) इंदूर (२) सुरत (३) विजयवाडा

ब) एक लाखाहून कमी लोकसंख्येची शहरे : (१) विटा (२) लोणावळा (३) सासवड

क) सर्वोत्कृष्ट गंगानगर : वाराणसी

ड) भारतातील सर्वात स्वच्छ छावणी : (१) अहमदाबाद (२) मेरठ (३) अहमदाबाद

इ) फास्टेस्ट मूव्हर सिटी : होशंगाबाद (२०२० मध्ये ३६१व्या स्थानावर, तर २०२१ मध्ये ८७व्या स्थानावर झेप घेत १ लाखपेक्षा अधिक लोकसंख्येच्या अव्वल १०० शहरांच्या यादीत)

ई) सर्वात स्वच्छ राज्य :

१०० पेक्षा जास्त शहरी (नागरी) स्थानिक संस्था – 

(१) छत्तीसगड (सलग तिसऱ्यांदा प्रथम) 

(२) महाराष्ट्र 

(३) मध्यप्रदेश 

  • फास्टेस्ट मूव्हर राज्य म्हणून कर्नाटकला सन्मानित करण्यात आले.
  • १०० पेक्षा कमी नागरी स्थानिक संस्था – झारखंड (दुसऱ्यांदा) 
  • फास्टेस्ट मूव्हर राज्य म्हणून मिझोरामला सन्मानित केले गेले.

फ) नवीन कार्यप्रदर्शन श्रेणी : इंदोर, सूरत, नवी मुंबई, नवी दिल्ली नगर परिषद आणि तिरुपती या पाच शहरांना ‘प्लॅटिनम’ दर्जा.

इतर पुरस्कार :

अ) सफाईमित्र सुरक्षा आव्हान :

  • सहभागी शहरे : २४६
  • सर्वोच्च कामगिरी शहरे : इंदोर, नवी मुंबई, नेल्लोर, देवास
  • सर्वोच्च कामगिरी राज्य : छत्तीसगड आणि चंदीगड

ब) भारतातील पंचतारांकित कचरामुक्त शहरे :

नऊ शहरांना ५-स्टार शहरे म्हणून प्रमाणित करण्यात आले.

१) इंदोर

२) सूरत

३) नवी दिल्ली

४) नवी मुंबई

५) अंबिकापूर

६) म्हैसूर

७) नोएडा

८) विजयवाडा

९) पाटण

१४३ शहरांना ३ स्टार शहरे म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे.

देश पातळीवर महाराष्ट्राची कामगिरी

१) देशात स्वच्छतेत प्रथम आलेल्या छत्तीसगडला मात्र ६७ पुरस्कार मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावले आहेत.

२) नॉन अमृत – पहिल्या १०० शहरांमध्ये तब्बल ५६ शहरे

३) अमृत – पहिल्या १०० शहरांत तब्बल ३७ शहरे

४) देशातील २९९ कचरामुक्त स्वच्छ शहरांमध्ये सर्वाधिक १२४ शहरे

५) हागणदारीमुक्त (ODF+) शहरांमध्ये १६८ शहरे प्रमाणित

६) हागणदारीमुक्त (ODF ++) शहरांमध्ये २१२ शहरे प्रमाणित

७) महाराष्ट्रातील नॉन अमृत स्वच्छ शहर : (१) वीटा (२) लोणावळा (३) सासवड

८) महाराष्ट्राचे पहिले वॉटर प्लस सर्टिफिकेट मानकरी – नवी मुंबई

९) सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज : द्वितीय क्रमांक – नवी मुंबई

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराविषयी

  • सुरुवात : २०१६
  • आवृत्ती : सहावी
  • सर्वेक्षण घेणारी संस्था : क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया
  • जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण

स्वच्छ भारत मिशन-शहरी २.०

  • शीर्षकगीत : ‘हर धडकन स्वच्छ भारत की-’
  • सुरुवात : १ ऑक्टोबर २०२१
  • यासाठी एकात्मिक एमआयएस पोर्टल – स्वच्छताक्षम
  • अंमलबजावणी : २०२१ ते २६
  • लक्ष्य – कचऱ्याचे वर्गीकरण, एकल वापराचे प्लॅस्टिक आणि वायू प्रदूषण कमी करणे, बांधकाम आणि विध्वंसक कृतींमधून निर्माण झालेल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, कायदेशीर कचरा विल्हेवाट करण्याच्या ठिकाणाचे बायोरिमेडिएशन (bioremediation) यावर भर.

Contact Us

    Enquire Now