सुनील देशपांडे

सुनील देशपांडे

जन्म – १९६३

मृत्यू – २० मे २०२१

अल्प परिचय

  • मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक आणि आदिवासींना स्वयंपूर्ण करणारे सुनील देशपांडे यांचे नागपूर येथे निधन झाले.
  • ते ५८ वर्षांचे होते.
  • मेळघाटात लवादा येथे संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेची स्थापना करून आदिवासींना बांबू कारागिरी शिकविणे सुरू केल्याने तेथील लोकांना रोजगार मिळू लागले.
  • अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते.
  • मेळघाटातील बांबूच्या वस्तूंना देशभरात ओळख मिळवून दिले.
  • ‘कारागीर पंचायत’ संस्थेमार्फत ‘हुनर खोज यात्रे’च्या माध्यमातून देशातील हरहुन्नरी लोकांचा संग्रह करून वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू्ंचे प्रदर्शन भरवले.
  • ‘सृष्टिबंध’ या नावाने बांबूच्या राठ्या आणि कलावस्तूंना बाजार उपलब्ध करून दिले.
  • हरिसाल जवळील कोठा येथे कर्मकौशल्य शिकवण्याचे गुरुकुल उभारले आहे.

Contact Us

    Enquire Now