सिंगापूरने दुसर्‍या स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक पटकविला

सिंगापूरने दुसर्‍या स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक पटकविला

  • १७ सप्टेंबर २०२० रोजी, इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) ने सिंगापूर युनिव्हर्सिटी फॉर टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड डिझाईन, आयएमडी वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस सेंटर आणि स्मार्ट सिरीज वेधशाळेच्या सहकार्याने स्मार्ट शहरांच्या जागतिक यादीची दुसरी आवृत्ती विकसित केली.
  • या निर्देशांकात सिंगापूर त्यानंतर हेलसिंकी आणि तिसर्‍या क्रमांकावर झ्युरिक (स्वित्झर्लंड) आहे.
  • या क्रमवारीच्या कामाचे नेतृत्व आयएमडीचे प्रोफेसर आर्तुरो बिस यांनी केले.
  • एससीआय जगातील सर्व भागात स्मार्ट शहरांच्या वास्तविक विकासावर लक्ष ठेवते.
  • एससीआय २०२० मध्ये १९ शहरांमधील १२० नागरिकांना त्यांच्या शहरातील पाच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रश्न विचारले गेले. (आरोग्य, सुरक्षा, गतिशीलता (Mobality), क्रिया कलाप (Activities) संधी आणि प्रशासन)
  • स्मार्टसिटीच्या पहिल्या १०० शहरांमध्ये भारतातील ४ शहरांचा समावेश होतो. त्यात हैदराबाद (६७ व्या), नवी दिल्ली (६८ व्या), मुंबई (७८ व्या), बंगळुरू (७९ व्या) स्थानावर आहे.
  • या सर्व ४ शहरांमध्ये १५ प्रमुख क्षेत्रांपैकी वायूप्रदूषण या घटकाला अधोरेखित करण्यात आले आहे.

इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) बद्दल :

  •  आयएमडी एक स्वतंत्र शैक्षणिक संस्था आहे.
  • स्थापना : १९९० 
  • अध्यक्ष : जीन – फ्रँकोईस मंझोनी
  • आयएमडी प्रशिक्षण आणि सामान्य व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यावर केंद्रित आहे.

Contact Us

    Enquire Now