सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि लिंग विविधता

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि लिंग विविधता :

  • जी – २० भ्रष्टाचारविरोधी कार्यसमूहाने देखील २०१९-२१ च्या कृती आराखड्यात लिंग आणि भ्रष्टाचार यांच्यातील संबंधांची समज अधिक सखोल करण्यासाठी ठोस कृती करत आहे.
  • सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतील महिला सशक्तीकरणावरील समिती एनटीपीसी लिमिटेडमध्ये स्थापन करण्यात आली होती, ज्यात पीएसयूमध्ये महिलांचे प्रमाण वाढविणे, समान रोजगार संधी धोरण आणि कामाच्या ठिकाणी अनुकूलता आणण्यासाठी विशिष्ट मापदंडावर या समितीने शिफारसी दिल्या.
  • या शिफारसींमध्ये महिलांची कर्मचारी म्हणून संवेदनशीलता, तक्रार निवारण प्रणाली, बदली/प्रशिक्षण/करिअर व्यवस्थापन इत्यादींविषयी लिंग-संवेदनशील प्रशासकीय उपाययोजनांचा समावेश आहे.
  • या समितीने नमूद केले आहे की, गेल्या ३ वर्षांत भारतातील महारत्न कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची सरासरी टक्केवारी फक्त ७.४ टक्के आहे.

Contact Us

    Enquire Now