सप्टेंबरपर्यंत बुडित कर्जे दुपटीने वाढणार

सप्टेंबरपर्यंत बुडित कर्जे दुपटीने वाढणार – 

  • भारतीय बँकांमधील एकूण अनुत्पादित मालमत्ता (ग्रॉस एनपीए) म्हणजेच एकंदर बुडित कर्जे ही पत-गुणवत्तेबाबत तीव्र ताणाच्या परिस्थितीच्या परिणामी सप्टेंबर 2021 पर्यंत 14.8 टक्क्यांवर पोहोचतील, असे भाकित रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वित्तीय स्थिरता अहवालातून व्यक्त करण्यात आले.
  • हा वित्तीय स्थिरता अहवाल म्हणजे, पतगुणवत्तेतील संभाव्य घसरण रोखण्यासाठी बँकांची पुरेशा भांडवलासह तयारी करण्याची गरज सूचित करणारा आहे.

वित्तीय स्थिरता अहवाल काय सांगतो?

  • सप्टेंबर 2020 मधील 7.5 टक्क्यांच्या तुलनेत एकूण बुडित कर्जांमधील ही जवळपास दुप्पट वाढ असेल.
  • सामान्य परिस्थितीतही बँकांची बुडित कर्जे ही येत्या सप्टेंबरपर्यंत एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत 13.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतील.
  • देशातील व्यापारी बँकांचे जोखीम-भारित मालमत्ता प्रमाण (CRAR) हे मार्च 2020 मधील 14.7 टक्क्यांवरून सप्टेंबर 2020 अखेर 15.8 टक्क्यांवर पोहोचले.
  • देशातील आर्थिक स्थिती आणखी गंभीर बनल्यास सार्वजनिक, खासगी आणि परदेशी बँकांच्या अनुत्पादक कर्जाचे प्रमाण अनुक्रमे 17.6, 8.8 आणि 6.5 टक्क्यांपर्यंत वाढेल.
  • मार्च 2020 ते सप्टेंबर 2020 दरम्यान बँकांच्या एकूण बुडित कर्जाचे प्रमाण 8.4 टक्क्यांवरून 7.5 टक्के असे गुणात्मक सुधारले.
  • याच काळात बुडित कर्जांबाबत ताळेबंदात करावयाच्या आर्थिक तरतुदीचे (PCR) प्रमाण 66.2 टक्क्यांवरून 72.4 टक्के सुधारले.
  • कोरोना कहराचा परिणाम कमी करण्यासाठी नियामक या नात्याने मध्यवर्ती बँकेकडून केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे बँकांच्या कामगिरीचे मापदंड लक्षणीय सुधारले, असे हा अहवाल नमूद करतो.
  • 7 जानेवारीला जाहीर केलेल्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या GDP पहिल्या आगाऊ अंदाजानुसार बृहत् ताण चाचणीच्या आधारे बुडित कर्जाच्या आकडेवारीचा निष्कर्ष काढला गेला.
  • दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जाण्याआधी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) जीडीपीसंबंधाने आगाऊ अंदाज मांडला जातो.

 

अकार्यकारी संपत्ती – NPA 

 

  • बँकांची संपत्ती म्हणजे बँकांनी दिलेली कर्जे, बँकांनी दिलेली अग्रिमे, बँकांनी केलेल्या गुंतवणुकी होय.

अकार्यकारी संपत्ती म्हणजे काय?

  • बँकेची अशी संपत्ती जी बँकेसाठी उत्पन्न मिळवून देऊ शकत नाही.
  • अकार्यकारी संपत्ती म्हणजे असे अग्रिम किंवा अशी कर्जे
  • 1 जुलै 2014 ला संपत्ती वर्गीकरणाची सुधारित पद्धत रिझर्व्ह बँकेने सुचविली.

अकार्यकारी संपत्तीचे वर्गीकरण – 

  1. अनुप्रमाणित (sub-strandard) – अशी संपत्ती जी 10 दिवसांपेक्षा जास्त व 12 महिन्यांपेक्षा कमी किंवा12 महिने अकार्यकारी राहिली आहे.
  2. साशंक (Doubtful) – अशी संपत्ती जी 1 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत अकार्यकारी राहिली आहे.
  3. गमावलेली संपत्ती (loss of assets) – बँकेने किंवा रिझर्व्ह बँकेच्या लेखापरीक्षकाने कर्जे बुडित झाल्याचे घोषित केले, ती कर्जे गमावलेली संपत्ती म्हणून गणली जातात.
    • जानेवारी 2014 मध्ये भारतीय बँकांनी एखादी संपत्ती अकार्यकारी होण्याआधीच काय काळजी घेतली पाहिजे, यासाठी बँकांना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.
    • पायाभूत सुविधा आणि गाभा उद्योगांना (core industries) कर्जे देताना त्यात लवचिकता कशी ठेवता येईल अशा मार्गदर्शक सूचनाही रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्या.
    • रिझर्व्ह बँकेने बुडत्या कर्जदारांकडून पैसे वसूल करणाऱ्या ARC (Asset Reconstruction Companies) कंपन्यांविषयक नियम कडक केले.
  • CRAR (capital to Risk weighted Asset Ratio)
  • अतिनुकसानीमुळे दिवाळखोर होण्याच्या संकटाला बँका कितपत तोंड देऊ शकतात हे मोजण्यासाठी बँकांची भांडवल पर्याप्तता मोजली जाते.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर ही क्षमता मोजण्यासाठी भांडवल पर्याप्तता प्रमाण (CAR – capital Adequacy Ratio) मोजले जाते.
  • बँकांचे एकूण भांडवल आणि बँकांची जोखीम भारीत संपत्ती यांचे प्रमाण म्हणजे CAR.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसल 3 निकषानुसार बँकांचा CRAR 11.5% असणे अपेक्षित असते.
  • बँकांकडे असलेल्या भांडवलाचे वर्गीकरण Tier – I आणि Tier – II असे केले जाते.
  • Tier -I भांडवल म्हणजे सामाईक भांडवली समभाग आणि घोषित भांडवली साठा.
  • Tier -I भांडवल हे एखाद्या बँकेचे प्राथमिक भांडवल असून त्याला गाभा भांडवल असेही म्हणतात.
  • Tier -II भांडवलात बँकांच्या अव्यक्त भांडवली साठा, पुनर्मूल्यांकित भांडवली साठा आणि कर्जवसुलीतून मिळालेल्या मिळकती गणल्या जातात.
  • Tier -II भांडवल हे दुय्यम प्रतीचे असून त्याला पूरक भांडवल असे म्हणतात.
  • CRAR मध्ये जोखीम विचारात घेतात, तर NPA मध्ये कर्जे खरंच बुडताहेत का हे विचारात घेतात.

Contact Us

    Enquire Now