संघ लोकसेवा आयोगाचे (यू.पी.एस.सी) अध्यक्ष म्हणून प्रदीप कुमार जोशी यांची नेमणूक

संघ लोकसेवा आयोगाचे (यू.पी.एस.सी) अध्यक्ष म्हणून प्रदीप कुमार जोशी यांची नेमणूक

    • ६ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदीप कुमार जोशी यांची यू.पी.एस.सी चे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
    • माजी अध्यक्ष अरविंद सक्सेना यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

 

  • प्रदीप कुमार जोशी

 

    • २०१५ मध्ये संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
    • यापूर्वी त्यांनी छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
    • राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठाचे (NUEPA – स्थापना – १९६२) माजी संचालक
    • प्रशासनामधील अनेक समित्यांचे सदस्यत्व

 

  • संघ लोकसेवा आयोग

 

    • राज्यघटनेच्या भाग १४ मधील कलम ३१५ ते ३२३ मध्ये या आयोगाची संरचना, सदस्यांची नियुक्ती आणि पदच्युतीबाबत तरतूद
    • राष्ट्रपती अध्यक्ष व इतर सदस्यांची नेमणूक करतात.
    • सदस्यांची संख्या राज्यघटनेमध्ये सांगितलेली नाही. ही बाब राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारावर सोडली आहे.
    • निम्मे सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारांच्या सेवेत किमान १० वर्षे असावेत. हे वगळता राज्यघटनेत कोणतेही निकष सांगितलेले नाहीत.
    • कार्यकाळ – ६ वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे यांपैकी जे अगोदर पूर्ण होईल, तोपर्यंत.

 

  • महत्त्वाचे –

 

  • १५ वी घटनादुरुस्ती, १९६३ अन्वये राष्ट्रपती एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतात.
  • १९१९ च्या भारत सरकारच्या कायद्याने १९२६ साली संघलोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
  • राज्यलोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हे संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी किंवा सदस्यत्वासाठी किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो.

Contact Us

    Enquire Now