विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा २०२१

विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा २०२१

ठिकाण : विम्बल्डन, लंडन (UK)

कालावधी : २८ जून ते ११ जुलै २०२१

आवृत्ती : १३४वी

पहिल्यांदा आयोजन : १८७७

  • दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच कोविड-१९ मुळे २०२० ची स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
  • जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा.

पुरुष एकेरी :

  • विजेता : नोवाक जोकोविच (सर्बिया)
  • इटलीच्या मातेओ बेरेटिनीला पराभूत केले.
  • जागतिक क्रमवारीत ३४ वर्षीय जोकोविच अव्वल स्थानावर आहे.
  • जोकोविचने रॉजर फेडरर, राफेल नदाल यांच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांची बरोबरी साधत त्याच्या संपूर्ण कारकीर्दीतील विसावे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
  • १९६८ नंतर विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीचे सहा वेळा विजेतेपद जिंकणारा जोकोविच तिसरा खेळाडू. (२०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१)
  • ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धांसह हे मोसमातील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद.
  • विम्बल्डनमधील जोकोविचचा हा सलग २१ वा विजय.

जोकोविचने पटकाविलेले ग्रँडस्लॅम विजेतेपद :

१) विम्बल्डन
२) ऑस्ट्रेलियन ओपन
३) फ्रेंच ओपन
४) अमेरिकन ओपन

महिला एकेरी :

  • विजेता : ॲश्ले बार्टी (ऑस्ट्रेलिया)
  • झेक प्रजासत्ताकाची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा पराभव केला.
  • बार्टीचे हे फ्रेंच ओपननंतरचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद असून विम्बल्डनचे पहिले जेतेपद आहे.
  • मार्गारेट कोर्ट व इव्होनी कावलीनंतर विम्बल्डन जेतेपद जिंकणारी तिसरी ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू.
  • २५ वर्षीय बार्टीने २०११ मध्ये विम्बल्डन ज्युनिअरचे जेतेपद पटकाविले होते.

ज्युनियर मुलांचे एकेरी :

  • विजेता : समीर बॅनर्जी (अमेरिका)
  • भारतीय वंशाच्या समीरने अमेरिकेच्या व्हिक्टर लिलोवर मात केली.

Contact Us

    Enquire Now