वित्तीय तुटीचे वाढते प्रमाण कायम

वित्तीय तुटीचे वाढते प्रमाण कायम

  • चालू वित्तीय वर्षासाठी केंद्र सरकारने वित्तीय तुटीचे प्रमाण ऑक्‍टोबरअखेरीस 9.53 लाख कोटी रुपये म्हणजेच वार्षिक बजेटच्या सुमारे 120 टक्क्यांपर्यंत निश्चित केले आहे.
  • देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ एप्रिल ते ऑक्‍टोबर 2020 या सात महिन्यांत 13 टक्क्यांनी घसरली.
  • खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने तसेच स्टील निर्मितीतील वाढीचा दर उणे नोंदवला गेला आहे.
  • तर कोळसा, रासायनिक खते, सीमेंट, ऊर्जानिर्मितीत वाढ झाली आहे.
  • 2019-20 मध्ये वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) 4.6% होती
  • वर्ष 2020-21 करिता वित्तीय तूट 7.96 लाख कोटी रुपये GDP च्या 3.5% असा अंदाज सरकारने अर्थसंकल्पादरम्यान बांधला होता.

महत्त्वाचे मुद्दे – 

  • वित्तीय तूट (Fiscal deficit) – यालाच राजकोषीय तूट असेही म्हणतात.
राजकोषीय तूट = अर्थसंकल्पीय तूट + कर्ज

किंवा

राजकोषीय तूट = कर्जे

(1996-97 पासून अर्थसंकल्पीय तूट शून्य दाखवली जाते.) राजकोषीय तुटीला कर्ज निर्माण करणारी जमा असे म्हणतात.

किंवा

राजकोषीय तूट = एकूण खर्च – [प्राप्ती + पुनःप्राप्ती + सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम]

Fiscal deficit = Total Expenditure – [Receipts + Recovery + Sale of Public Assets]

किंवा 

राजकोषीय तूट = महसुली प्राप्ती + भांडवली प्राप्ती – एकूण खर्च

Fiscal deficit = Revenue Receipts + Capital Receipts – Total Expenditure

राजकोषीय दायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा, 2003

(Fiscal Responsibility and Budget Management Act, 2003)

अंमलबजावणी – 5 जुलै 2004

  • राजकोषीय तूट व महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधने  – 
  • 1. मार्च 2009 पर्यंत महसुली तूट शून्यावर आणणे.
  • 2. मार्च 2009 पर्यंत राजकोषीय तूट 3 टक्क्यांपर्यंत आणणे.
  • एन. के. सिंग समितीने 2023 पर्यंत केंद्र सरकारचे कर्ज – जीडीपी गुणोत्तर, राजकोषीय तूट आणि महसुली तूट यांमध्ये घडवून आणण्यासाठी  पुढील लक्ष्ये स्वीकारण्याची शिफारस.
वर्ष कर्ज जीडीपी गुणोत्तर राजकोषीय तूट महसुली तूट
2017 49.4% 3.5% 2.3%
2013 38.7% 2.5% 0.8%

Contact Us

    Enquire Now