लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या प्रकरणाची तातडीने सुनावणीसाठी जलदगती न्यायालयाची स्थापना

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या प्रकरणाची तातडीने सुनावणीसाठी जलदगती न्यायालयाची स्थापना

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 या दोन वर्षांसाठी केंद्र पुरस्कृत योजना म्हणून 389 ‘पॉक्सो’ न्यायालयासह 1023 जलदगती न्यायालयांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याच्या निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
  • दिल्लीतील अल्वयीन मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येची घटना घडल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या प्रकरणाची तातडीने सुनावणी करणे व दोषींना शिक्षा देणे, यासाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
  • अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचार विरोधी (पॉक्सो) कायद्यातही दुरुस्ती करण्यात आली आहे.
  • या गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. पण या संदर्भातील खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयामध्ये केली जाईल.
  • सध्या राज्यांमध्ये जलदगती न्यायालये चालवली जात आहेत.
  • या न्यायालयासाठी 1572.86 कोटींची तरतूद, त्यात केंद्राचा वाटा 971 कोटी (75%) तर राज्यांचा वाटा 601.16 कोटी (25%) असेल.

Contact Us

    Enquire Now