लुप्त अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित

लुप्त अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित

  • दीडशे वर्षापूर्वी शेकडो गावांची तहान भागवणारी सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदी गेली कित्येक दशके निसर्ग आणि मानवी उपद्रवामुळे हरवून गेली होती.
  • गाळ, माती, झाडाझुडपांनी तिचे अस्तित्वच संपवून टाकले होते.
  • प्रशासन आणि लोकसहभागातून लुप्त झालेल्या या नदीचे पात्र प्रवाहित करण्याच्या कार्यामुळे आता १०५ गावांना पाण्याचा लाभ झाला असून या कार्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
  • सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम पावणारी अग्रणी नदी खानापूरसह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातून ५५ किलोमीटर्स वाहून कर्नाटकात जाते. या नदीचे २२ किलोमीटर्सचे पात्र लुप्त झाले होते.
  • सात वर्षांपूर्वी नदीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेण्यात आले होते.

Contact Us

    Enquire Now