ला गणेशन यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती

ला गणेशन यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती

  •  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तमिळनाडूचे ज्येष्ठ भाजप नेते ला गणेशन यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.

पार्श्वभूमी:

  • नजमा हेपतुल्ला यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त होते.
  • सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
  • मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. व्ही. संजय कुमार यांनी गणेशन यांना पदाची शपथ दिली.

ला गणेशन:

  • जन्म: १६ फेब्रुवारी, १९४५
  • राजकीय पक्ष: भारतीय जनता पार्टी
  • शिक्षण: एस. एस. एल. बी.
  • तमिळनाडू युनिटचे सरचिटणीस होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून कार्य केले आहे.
  • २०१६-१८ दरम्यान राज्यसभा सदस्य म्हणून पदभार सांभाळला आहे.
  • २७ ऑगस्ट २०१९ रोजी मणिपूरचे सतरावे राज्यपाल म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.

मणिपूर 

रत्नभूमी (दी लँड ऑफ ज्यूवेल्स) म्हणून उल्लेख.

  • स्थापना: २१ जानेवारी १९७२
  • साक्षरता: ७९.८५%
  • जमाती: नागा, कुकी-झो
  • मणिपुरी नृत्य प्रसिद्ध.
  • उत्सव: या शांग (डोल यात्रा) लाइ-हरोबा, रथ यात्रा (कांग), निंगोल चकौबा, दसरा (क्वाक यात्रा)
  • राज्यपालांसंबंधित महत्त्वाची कलमे:
‍कलम तरतूद
१५३ राज्यासाठी एक राज्यपाल असेल.
१५४ राज्याचे कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे विहित केली जाईल.
१५५ राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीच्या सही- शिक्क्यासह केली जाईल.
१५६ पदावधी
१५७ राज्यपालपदाच्या पात्रता-

अ) तो भारताचा नागरिक असावा.

ब) वयाची ३५ वर्षे पूर्ण असावा.

१५८ राज्यपालपदाच्या शर्ती
१५९ शपथ
१६० विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये पार पाडणे.
१६१ क्षमादानाचा अधिकार
१६२ राज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती
१७६ राज्यपालाचे विशेष अभिभाषण
२१३ राज्यपालाचा वटहुकूम काढण्याचा अधिकार

Contact Us

    Enquire Now