रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी विभागांना भांडवली खर्चासाठी निधी वितरण :755 निधी

रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी विभागांना भांडवली खर्चासाठी निधी वितरण :755 निधी

  • ज्या विभागांमार्फत रोजगार निर्मितीस चालना देण्यास भांडवली खर्च केला जातो अशा बाबीसाठी विभागांना भांडवली लेखाशीर्षांगतचा सन 2020-21 साठीच्या अर्थसंकल्पित निधी 75% वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • तसेच आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गतचा निधी व जिल्हा वार्षिक योजना या अंतर्गतचा निधी 100 टक्के वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • राज्याच्या आर्थिक स्थितीस चालना देण्यासाठी, राज्यातील रोजगार निर्मितीस चालना देणे व अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी दूरगामी उपाययोजना म्हणून शासनाने मान्यता दिली.
  • कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या कोविड-19 महामारीमुळे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्याला मिळणाऱ्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
  • महामारीच्या काळात महसूल प्राप्त होत नसला तरीही, आरोग्य पोलीस प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा सुरळीत ठेवणे इत्यादी तातडीच्या बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यामुळे इतर खर्चावर निर्बंध घालावे लागले.
  • अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी विविध राजकोषीय उपाययोजना केंद्रशासन, राज्यशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत केल्या जात आहेत.

Contact Us

    Enquire Now