रेल्वे कौशल्य विकास योजना

रेल्वे कौशल्य विकास योजना

‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचा भाग म्हणून भारतीय रेल्वेने ‘रेल्वे कौशल्य विकास योजना’ आखली आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे.

  • उद्योग कौशल्यांमध्ये तरुणांना सक्षम बनविणे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  • योजनेअंतर्गत तरुणांना रेल्वे प्रशिक्षण संस्थांमध्ये उद्योगाशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • त्यासाठी रेल्वेच्या १७ झोन्समधील ७५ प्रशिक्षण केंद्रे आणि ७ उत्पादन युनिटची निवड करण्यात आली आहे.
  • सुरुवातीला एक हजार उमेदवारांना तर ३ वर्षांत ५०,००० तरुणांना सुमारे १०० तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • दहावी उत्तीर्ण आणि १८ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
  • निवडलेल्या उमेदवारांना इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनरी आणि फिटर या चार ट्रेडमध्ये विना-शुल्क प्रशिक्षण देण्यात येईल.
  • तसेच प्रादेशिक मागण्या आणि गरजांना ओळखून या कार्यक्रमांतर्गत इतरही ट्रेड्‌सचा समावेश केला जाईल.
  • बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सने या योजनेचा अभ्यासक्रम विकसित केला आहे.
  • प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थींना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रेल आणि ट्रान्सपोर्टद्वारे दिलेल्या ट्रेडमधील प्रमाणपत्र दिले जाईल.
  • उमेदवारांना त्यांच्या व्यवसायासाठी टूलकिटदेखील पुरविले जातील.
  • या प्रशिक्षणाच्या आधारावर योजनेत सहभागी होणाऱ्यास भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळण्याचा दावा याअंतर्गत करण्यात आलेला नाही.

Contact Us

    Enquire Now