राही सरनौबत हिला आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

राही सरनौबत हिला आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक

  • ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कोल्हापूरची राही सरनौबत हिने शानदार कामगिरी करत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
  • याच गटात युवा नेमबाज मनु भाकर हिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • राहीमार्फत भारताने या स्पर्धेत पहिल्याच सुवर्णपदकाची नोंद केली.
  • भारताने या अगोदर एक रौप्य व दोन कांस्यपदके मिळवली आहेत.
  • राहीने अंतिम फेरीत 39 गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
  • फ्रान्सच्या आथिल्डे लॅमोल हिने ३१ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.

Contact Us

    Enquire Now