राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन (National Medical Commission)

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन (National Medical Commission)

  • केंद्र सरकारने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना करून अनेक दशकांपासून असलेली भारतीय वैद्यकीय परिषद (Indian Medical Council) ही संस्था रद्दबातल केली. 
  • NMC दैनंदिन कामकाजासाठी पदवी व पदव्युत्तर वैद्यकशिक्षण मंडळ, वैद्यकीय मूल्यांकन व क्रमवारी मंडळ, निती व वैद्यकीय नोंदणी अशा ४ मंडळांची स्थापना करण्यात आली. 
  • निती आयोगाच्या व यापूर्वीच्या नियोजन आयोगाच्या शिफारसींनी हा आयोग ‘वैद्यकीय शिक्षण व व्यवसायाचा सर्वोच्च नियामक’ बनला आहे. 
  • राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायद्याअंतर्गत या आयोगाची स्थापना केली असून या कायद्यानुसारच पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) अनिवार्य केली आहे. 

आयोगाची संरचना :

१. आयोगामध्ये ३३ सदस्य ः १ अध्यक्ष, १० पूर्णवेळ सदस्य, २२ अर्धवेळ सदस्य 

२. डॉ. सुरेशचंद्र शर्मा (निवृत्त प्राध्यापक ENT, AIMS दिल्ली) 

३. डॉ. स्मिता कोल्हे (मेळघाटच्या आदिवासी भागात काम) या आयोगाच्या तज्ज्ञ समितीत आहेत. 

४. राकेश कुमार वत्स यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

आयोगाची कार्ये : 

  • वैद्यकीय व्यावसायिक आणि वैद्यकीय संस्थांचे नियमन करण्यासाठी धोरणे तयार करणे. 
  • राज्य वैद्यकीय परिषद नियम व कायद्याचे पालन करीत असल्याची सुनिश्चिती करणे. 
  • पदव्युत्तर प्रवेश व नोंदणी यासाठी MBBS परीक्षेनंतर सामायिक अंतिम परीक्षेची कार्यपद्धती ठरवणे. 

आयोगाअंतर्गत चार स्वायत्त मंडळ 

१. स्नातक वैद्यकीय शिक्षण मंडळ 

२. स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळ 

३. वैद्यकीय संस्थांचे निर्धारण व मूल्यांकन मंडळ 

४. शिष्टाचार व वैद्यकीय नोंदणी मंडळ 

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय 

  • केंद्रीय मंत्री हर्षवर्धन 
  • राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे

Contact Us

    Enquire Now