राज्यात विकास आराखडे GIS प्रणालीवर आधारित केले जाणार

राज्यात विकास आराखडे GIS प्रणालीवर आधारित केले जाणार.

विकास आराखड्यांसाठी GIS प्रणाली वापरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

  • महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 नुसार नगरपंचायत, नगरपरिषद अथवा कोणत्या नियोजन प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून तीन वर्षांत त्याच्या क्षेत्राची विकास योजना तयार करून ती शासनाकडे पाठवणे बंधनकारक असते.
  • हे विकास आराखडे आजवर पारंपरिक पद्धतीने म्हणजेच नकाशांवर आधारित बनविले जात.
  • मात्र आता यांसाठी GIS (जिअॉग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम) प्रणाली वापरली जाणार आहे.
  • असे करणारे महाराष्ट्र राज्य पहिले राज्य ठरणार आहे
  • या प्रणालीमुळे विकास आराखड्याची अंमलबजावणी अधिक बिनचूक तसेच त्याच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवता येणार आहे.
  • काय आहे GIS प्रणाली – GIS
  • दूरसंवेदन (रिमोट सेन्सिंग) आणि संगणक प्रणाली यांच्या विकसनाचा एकत्रित परिणाम म्हणजे GIS 
  • थोडक्यात ही एक संगणक प्रणाली आहे. यामध्ये विविध माहितीचे आदान (Inplus) दिल्यानंतर त्या माहितीचे विश्लेषण व पृथक्करण होते व प्रभावीपणे सादरीकरण केले जाते.
  • समजा आपल्याला नागरी नियोजनासाठी GIS प्रणालीचा वापर करायचा आहे व त्याअंतर्गत एखाद्या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करायचा आहे, तर त्यासाठी त्या क्षेत्राबाबत सर्व माहिती उपग्रहांमार्फत अर्थात रिमोट सेन्सिंगद्वारे घेतली जाईल. त्यानंतर ही माहिती GIS प्रणालीमध्ये दिली जाते. याचे माहिती संकलन व पृथक्करण केले जाते. उदाहरणार्थ त्या क्षेत्रात असलेले वनक्षेत्र, एकूण लागवडीखालील क्षेत्र, पायाभूत सुविधा यांबाबतची माहिती प्रभावी सादरीकरणाद्वारे मांडली जाईल. 
  • या सादरीकरणाद्वारे त्या क्षेत्राचा विकास आराखडा तयार केला जाईल. शासनाकडून मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल.
  • यामध्ये शासन तसेच सहभागी घटक वेळोवेळी या अंमलबजावणीवर GIS प्रणालीवर लक्ष ठेवतील.
  • जर आराखड्यानुसार 100 विहिरी बांधणे अपेक्षित होते तर याबाबत आधीची माहिती आणि सध्याची माहिती यांमध्ये तुलना केली जाईल.
  • म्हणजेच GIS प्रणाली ही एक वरदानच आहे.

भारत आणि GIS 

  • ISRO ने सन 1986 मध्ये स्वतंत्र GIS विभागाची स्थापना केली.
  • 1991 पासून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीने GIS सेवा पुरविण्यास प्रारंभ केला.
  • भारतातील रस्ते विकास, लोहमार्ग विकास, हवाईमार्ग विकास तसेच ट्रान्स गोल्डन मार्ग, चतुष्कोन महामार्ग हे GIS प्रणालीचे फलित आहे.
  • 2008 मध्ये भारताने National Vector-borne-disease control programme अंतर्गत देशाचा पहिला हिवताप नकाशा तयार केला.

Contact Us

    Enquire Now