राज्यातील पहिले शासकीय आयव्हीएफ केंद्र नागपुरात

राज्यातील पहिले शासकीय आयव्हीएफ केंद्र नागपुरात

  • काही समस्यांमुळे काही स्त्रियांच्या गर्भधारणेत अडचणी येतात. त्याच्यातील वंधत्वाची समस्या सोडवण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पथदर्शी प्रकल्प म्हणून पहिले शासकीय आयव्हीएफ (इन व्रिटो फर्टिलिटी) केंद्र तयार करण्याचे निश्चित केले आहे.
  • ते यशस्वी झाल्यास राज्याच्या इतरही भागात वैद्यकीय शिक्षण खात्याकडून हे केंद्र तयार केले जाईल.
  • आनुवंशिक व इतर काही कारणाने आई न होऊ शकणाऱ्यांना आयव्हीएफ पद्धतीने उपचार देऊन मातृत्वाचे सुख देता येते.
  • सध्या आयव्हीएफ उपचार पद्धती केवळ खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे.
  • या प्रकल्पासाठी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 95 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून तेथे या केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामुग्रीसह इतरही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
  • सध्या 25 ते 35 टक्के महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणेस अडचण येऊ शकते.

IVF विषयी – 

  • टेस्ट ट्यूब बेबीची व्यापकता जसजशी वाढू लागली तसतशी ते करण्याच्या पद्धतीमध्येही प्रचंड प्रमाणात विविधता आली. सुरुवातीला नैसर्गिकरीत्या तयार झालेले स्त्री-बीज आणि शुक्राणू हे अतिशय प्राथमिक अशा ‘कल्चर कंडिशन्स’मध्ये ठेऊन गर्भ तयार करीत असत. त्यामुळे गर्भधारणा राहण्याचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे 1-2 टक्के असे. जसजसे गर्भ धारणेबद्दलचे बारकावे कळत गेले, तसतसे वेगवेगळी इंजेक्शन्स, कल्चर मीडिया इन्क्युबेटर्स, त्याचप्रमाणे त्यातील कौशल्ये विकसित होत गेली आणि आज टेस्ट ट्यूब बेबीच्या उपचार पद्धतीनंतर गर्भधारणा राहण्याचे प्रमाण हे जास्तीत जास्त 40 ते 60 टक्क्यांवर स्थिरावले. आजच्या तारखेला 50 लाखाहून अधिक अपत्ये ही या तंत्रज्ञानामुळे जन्माला आली आहेत.
  • टेस्ट ट्यूब बेबी करायचे असेल तर स्त्रीला रोज 10-12 दिवसासाठी इंजेक्शन्स द्यावी लागतात. साधारणत: 8 ते 10 स्त्री बीजे वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. या इंजेक्शनचा योग्य परिणाम होतोय की नाही हे बघण्यासाठी वारंवार सोनाेग्राफी करून खात्री केली जाते आणि आवश्यक ते बदल केले जातात. एकदा स्त्री बीजे व्यवस्थित निर्माण झाली, की ती सोनोग्राफीच्या साह्याने बाहेर काढली जातात. गर्भ तयार करण्यासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. 

 

आय व्ही. एफ –

 

  • यात वीर्यावर एक विशिष्ट प्रक्रिया केली जाते (सीमेन प्रोसेसिंग) यामुळे त्यातील पुढे जाण्याची चांगली क्षमता असलेले व नॉर्मल शुक्राणू वेगळे केले जातात नंतर बाहेर काढलेली स्त्री बीजे व शुक्राणू (विशिष्ट प्रमाणात) एकत्रित इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. यामुळे शुक्राणू स्त्री बीज फलित करते. 16-18 तासानंतर किती स्त्री बीजे फलित झाली हे पाहिले जाते. अपेक्षित फलित झालेली स्त्री बीजे वेगळी करून त्यांपासून गर्भ निर्माण होतात हे बघितले जाते. तयार झालेल्या गर्भांपैकी काही गर्भाशयाच्या पिशवीत सोडले जातात.

Contact Us

    Enquire Now