राज्याचा वात्सल्य उपक्रम निराधार बालक व विधवा स्त्रियांसाठी

राज्याचा वात्सल्य उपक्रम निराधार बालक व विधवा स्त्रियांसाठी

  • कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
  • त्याच धर्तीवर निराधार मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालणारा ‘वात्सल्य’ हा उपक्रम सरकारतर्फे राबविण्यात येणार आहे.
  • कोरोनामुळे 14 हजार बालकांनी वडील गमावले तर 20 हजार महिला पतीच्या मृत्यूमुळे निराधार झाल्याचा सामाजिक संस्थांचा अंदाज आहे.
  • पालक गमावलेल्या बालकाबरोबरच विधवा झालेल्या महिलांच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.
  • या महिलांना कुटुंबातून व वारसा हक्कातून बेदखल करण्याच्या घटना समोर येत आहेत.
  • या महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने अनाथ बालकांसाठी राबवण्यात येत असलेल्या वात्सल्य उपक्रमामध्ये यांचा समावेश करण्यात येईल.
  • निराधार महिलांसाठी रोजगारनिर्मिती तसेच दैनंदिन बाबींसाठी लागणारी मदत देण्याच्या दृष्टीकोनातून काम केले जाईल, राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Contact Us

    Enquire Now