राज्याकडे गुंतवणुकीचा ओघ : सरकारचे 15 उद्योगांशी 35 हजार कोटींचे करार

राज्याकडे गुंतवणुकीचा ओघ : सरकारचे 15 उद्योगांशी 35  हजार कोटींचे करार 

  • कोविड-19 मुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून संपूर्ण देशातील उद्योग व्यवहार ठप्प झाले असताना जगभरातील गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच प्राधान्य दिले आहे.
  • देशविदेशातील 15 मोठ्या उद्योगसमूहांनी राज्यात सुमारे 35 हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • नव्या करारांमुळे राज्यात साधारणतः 23 हजार रोजगार निर्माण होतील.
  • सरकारच्या उद्योग स्नेही धोरणामुळे येत्या दोन महिन्यांत आणखी काही मोठ्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.
  • टाळेबंदीमुळे ठप्प झालेले उद्योगचक्र पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ जून महिन्यात करण्यात आला होता. 
  • पहिल्या टप्प्यात जूनमध्ये अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांशी 17 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले होते.
  • सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देशविदेशातील 15 कंपन्यांमार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासमवेत (MIDC) 34 हजार 850 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले.
  • यातील बहुतांश उद्योग चाकण-पुणे, रायगड तसेच नवी मुंबई आणि मुंबईत उभे रहाणार आहेत.
क्र. करार झालेल्या कंपन्या गुंतवणूक (कोटी रु.) रोजगार
1 मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया, जपान

490

350

2 ब्राईट सिनो होल्डिंग

1800

1575

3 ओरिएंटल एअरोमॅटिक्स

265

350

4 मालपाणी वेअर हाऊसिंग ॲण्ड इंडस्ट्रियल पार्क

950

8000

5 एव्हरमिंट लॉजिस्टिक

345

2100

6 पारिबा लॉजिस्टिक

381

2200

7 ईश्वर लॉजिस्टिक

395

2200

8 नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रा.

10555

575

9 अदानी एन्टरप्रायझेस

5000

1000

10 मंत्रा डेटा सेंटर, स्पेन

1125

80

11 एसटीटी ग्लोबल डेटा

825

800

12 कोल्ट डेटा सेंटर होल्डिंग्ज इंडिया एलएलपी, ब्रिटन

4400

100

13 प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप, सिंगापूर

1500

300

14 नेक्स्ट्रा

2500

2000

15 इएसआयआर इंडिया, सिंगापूर

4310

1522

मॅग्नेटिक महाराष्ट्र :

  • 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2018 दरम्यान मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्र ही जागतिक दर्जाची औद्योगिक परिषद पार पडली. 
  • भागीदार : केंद्र सरकारचे मेक इन इंडिया अभियान, महाराष्ट्र सरकार, MIDC, CII हे भागीदार होते, तर KPMG कंपनी जाहिरात भागीदार होती.
  • या परिषदेला 40000 पेक्षा जास्त व्यावसायिकांनी भेटी दिल्या. या काळात 150 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
  • या परिषदेत 12.1 लाख कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीचे आश्वासन उद्योजकांनी दिले. यासाठी महाराष्ट्र सरकार व उद्योजकांदरम्यान 401 MOU करार करण्यात आले.
  • वरील 16 लाख कोटी रुपयांच्या (12.1+3.9) गुंतवणुकीमुळे 3.67 दशलक्ष रोजगार निर्मिती क्षमता प्राप्त होणार आहे.
  • ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हे महाराष्ट्राच्या पाचव्या औद्योगिक धोरणाचे ब्रीदवाक्य होते. 

Contact Us

    Enquire Now