राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

  •  7 ऑगस्टला केंद्र शासनाने देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले आहे.
  •  देशभरातील नागरिकांच्या विनंतीमुळे सदर निर्णय घेण्यात आला, असे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

खेलरत्न पुरस्काराबद्दल :

  •  भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सन्मानार्थ 1991 पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
  •  हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असून क्रीडा मंत्रालयाद्वारे दरवर्षी देण्यात येतो.
  •  25 लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  •  1991 मध्ये भारताचे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना पहिला पुरस्कार जाहीर झाला.
  •  2020 मध्ये रोहित शर्मा (क्रिकेट), मरिअप्पन थंगावेलू (पॅराथलेटिक्स), मनिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश फोगाट (कुस्ती), राणी रामपाल (हॉकी) खेलरत्न पुरस्कार मिळाला. 

मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल :

  •  मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात.
  •  त्यांनी 1926 ते 1949 या काळामध्ये हॉकी या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. 
  •  या काळामध्ये त्यांनी 400पेक्षा जास्त गोल्स केले आहेत.
  •  1928, 1932 आणि 1936च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
  •  भारत सरकारने त्यांना 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. 
  •  2012 पासून 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. 
  •  नुकतेच महाराष्ट्र सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खासगी कंपन्यांना राजीव गांधी यांच्या नावाने नवीन पुरस्कार जाहीर करण्याचे ठरवले आहे.

Contact Us

    Enquire Now