राजनाथसिंह एससीओच्या बैठकीसाठी रशियाला रवाना

राजनाथसिंह एससीओच्या बैठकीसाठी रशियाला रवाना

  • शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या रशियाच्या दौर्‍यावर रवाना झाले.
  • राजनाथ सिंह यांनी रशियाच्या सर जनरल सर्गे शोईगु यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी भारताच्या संरक्षण आणि सुरक्षेच्या गरजेच्या अनुषंगाने रशियाने दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले. 
  • दोन्ही देशांनी एके ४७-२०३ च्या निर्मितीसाठी एक मोठा करारही केला. 
  • एके ४७ २०३ एके रायफलची सर्वात आधुनिक आणि अत्याधुनिक आवृत्ती असून ती भारतीय लघुशस्त्रास्त्रे (INSAS) ५.५६ x ४५ mm असॉल्ट रायफलची जागा घेईल.
  • तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उत्पादन युनिट स्थापित करण्यासह प्रत्येक रायफलची किंमत अंदाजे १,१०० डॉलर्स असणे अपेक्षित आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उत्तरप्रदेशमधील कोरवा आयुध फॅक्टरीत ७.६२ × ३९ मि.मी. रशियन शस्त्र तयार केले जाईल.
  • ४ सप्टेंबर, २०२० रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीपूर्वी रशियाच्या सशस्त्र सैन्याच्या मॉस्कोमधील संग्रहालयात संकुलातील २० जून २०२० रोजी उघडलेल्या मुख्य कॅथेड्रल (चर्च) ला राजनाथ सिंह यांनी भेट दिली.
  • कॅथेड्रलचे सहा सोनेरी घुमट रशियन सैन्य दलाच्या प्रत्येक शाखेच्या संरक्षण संतांना समर्पित आहेत.
  • राजनाथ सिंह यांनी रशियाच्या केमेरोव्ह भागात वार्षिक दहशतवादविरोधी अभ्यास ‘पीस मिशन’ आयोजित केल्याबद्दल रशियन फेडरेशनचे आभार मानले.

शांघाय सहकार्य संघटनेबद्दल (SCO) :

  • सचिवालय, बीजिंग, चीन
  • सरचिटणीस : ब्लादिमीर इमामाचिव नॉटोव्ह
  • सदस्य : ८ देश (भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान)
  • युरोप आणि रशिया या दोन्ही खंडांतील देशांच्या सहभागाने बनलेली ही राजकीय, आर्थिक व लष्करी संघटना आहे. 

एससीओची रचना व कार्ये :

  • शांघाय सहकार्य संघटना अनेक समित्यांची मिळून बनलेली आहे.
  • राष्ट्रप्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे.
  • शासकीय प्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी दुसर्‍या क्रमांकाची समिती आहे.
  • या समितीची दरवर्षी शिखर परिषद होते.
  • जुलै २००५ मध्ये कझाकिस्तानच्या अस्ताना येथे झालेल्या शिखर परिषदेत भारत, इराण, मंगोलिया आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी पहिल्यांदा शिखर परिषदेस उपस्थित होते.
  • जुलै २०१५ मध्ये रशियाच्या उफा येथे SCO ने भारत आणि पाकिस्तानला संपूर्ण सदस्य म्हणून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.
  • ९ जून २०१७ रोजी अस्ताना येथे झालेल्या शिखर परिषदेत भारत आणि पाकिस्तान SCO मध्ये अधिकृतपणे पूर्ण सदस्य म्हणून सामील झाले.

Contact Us

    Enquire Now