रशियात होणाऱ्या झपाड २०२१ या बहुराष्ट्रीय सैनिकी सरावात भारतीय लष्कर सहभागी

रशियात होणाऱ्या झपाड २०२१ या बहुराष्ट्रीय सैनिकी सरावात भारतीय लष्कर सहभागी

  • रशियातील निझनीय येथे होणाऱ्या ‘झपाड’ २०२१ या बहुराष्ट्रीय सैनिकी सरावात भारतीय लष्करातील २०० जवानांची तुकडी भाग घेणार
  • झपाड २०२१ हा रशियाच्या सशस्त्र दलांचा महत्त्वाचा सराव आहे.
  • या सरावात दहशतवादाविरोधातील कारवाईवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे.
  • भारतीय लष्करातर्फे या सरावात भाग घेणारा नागा बटालियन संघ सर्व शस्त्रांनी सुसज्ज अशा एकत्रित कृती दलाचे प्रदर्शन करणार आहे.
  • या सरावात सहभागी होणाऱ्या सर्व देशांदरम्यान लष्करी तसेच धोरणात्मक नातेसंबंध अधिक उत्तमपणे जोपासले जावेत या उद्देशाने लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

पॉवरग्रीडला-असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंटचा २०२१ चे पारितोषिक

  • केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत महारत्न केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाने प्रतिष्ठित असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट (एटीडी) २०२१ बेस्ट ॲवॉर्ड पटकावले आहे.
  • जगभरातल्या ७१ संस्थांमध्ये आठवे स्थान पॉवरग्रिडने पटकावले आहे.
  • परिश्रमपूर्वक प्रयत्नासाठी पॉवरग्रिडला हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे.
  • पॉवरग्रिड अकादमी ऑफ लीडरशिपने हा प्रतिभा विकास उपक्रम पॉवरग्रिडमध्ये राबवला होता.
  • पॉवरग्रिड अकादमी ऑफ लीडरशिप (पीएएल) ही व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्लायंटला सेवा देणारी पॉवरग्रिडची संस्था आहे.
  • सर्वोच्च २० कंपन्यामधल्या केवळ दोन भारतीय कंपन्यांपैकी पॉवरग्रिड या एकमेव कंपनीला एटीडी पारितोषिक भेटला आहे.

 

पॉवरग्रिड कार्पोरेशन इंडिया लिमिटेड (PGCIL)

 

  • पीजीसीआयएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला भारत सरकारने २३ ऑक्टोबर २०१९ रोजी महारत्न दर्जा दिला आहे.
  • स्थापना – २३ ऑक्टोबर १९८९
  • मुख्यालय – गुरुग्राम (हरियाणा)

Contact Us

    Enquire Now