यूकेसाठी थेट परकीय गुंतवणुकीचा भारत दुसरा सर्वात मोठा स्रोत

यूकेसाठी थेट परकीय गुंतवणुकीचा भारत दुसरा सर्वात मोठा स्रोत

  • यूकेच्या आंतराष्ट्रीय व्यापार विभागाने 2020-21 साठी आवक गुंतवणूक आकडेवारी (Inward Investment Statistics) 22 जून रोजी जाहीर केली.
  • या आकडेवाडीनुसार, युनायटेड किंगडमसाठी थेट परकीय गुंतवणुकीचा अमेरिकेनंतर दुसरा सर्वात मोठा स्रोत म्हणून भारताने आपले स्थान कायम ठेवले आहे.
  • भारतीय कंपन्यांनी यूकेमध्ये 99 प्रकल्पांमध्ये  गुंतवणूक करून 4,830 रोजगार निर्माण केले आहेत.
  • अमेरिकेने युनायटेड किंग्डममध्ये 389 प्रकल्पात गुंतवणूक करून 19,301 नवीन रोजगार निर्मिती केली आहे; जी 2019 च्या तुलनेत कमी आहे.

महत्त्वाचे मुद्दे 

  1. कोविड- 19 तसेच बेक्झिटनंतरच्या बदलांच्या परिणामांमुळे रोजगारनिर्मितीत घट झाली आहे.
  2. अन्न-पेय, पर्यावरण पायाभूत सुविधा आणि वाहतूक तसेच जैवतंत्रज्ञान आणि औषधी या क्षेत्रांत अधिक रोजगारनिर्मिती झाली आहे.
  3. परकीय गुंतवणुकीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत 55,319 नवीन रोजगार तयार झाले असून दक्षिण-पश्चिम भागातील त्याचे प्रमाण 52% इतके आहे.
  4. संयुक्‍त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विषयक परिषदेने (UNCTAD) नुकत्याच केलेल्या विश्लेषणानुसार, यूकेचा एफडीआय प्रवाह जगात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जो 2019 च्या 2.1 ट्रिलियन डॉलर्सवरून 2020 मध्ये 2.2 ट्रिलियन डॉलर्स इतका वाढला आहे.

भारतातील एफडीआयचा प्रवाह

क्र. राज्यनिहाय क्षेत्रनिहाय
1 गुजरात सेवा
2 महाराष्ट्र संगणक, हार्डवेअर, आणि सॉफ्टवेअर
3 कर्नाटक दूरसंचार
4 दिल्ली व्यापार
5 तामिळनाडू बांधकाम

2020-21 आर्थिक वर्षात भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत अव्वल देश –

  1. सिंगापूर
  2. अमेरिका
  3. मॉरिशस

Contact Us

    Enquire Now