मोदी ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान

मोदी ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसचे पंतप्रधान

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मागे टाकत सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत.
  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपला संपूर्ण काळ मिळून २२६८ दिवस देशाचे पंतप्रधान होते. ते आतापर्यंत सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधानपदावर राहणारे एकमेव बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना याबाबतीत मागे टाकले आहे.
  • अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. ते पहिल्यांदा १९९६ मध्ये पंतप्रधान झाले. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. यानंतर ते १९९८ आणि १९९९ मध्ये पंतप्रधान झाले. ते २००४ पर्यंत सत्तेवर राहिले. तेव्हा आपला कार्यकाळ पूर्ण करणारे अटलबिहारी वाजपेयी हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले.
  • पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. ते १६ वर्षे २८० दिवस पंतप्रधानपदावर कार्यरत होते. तर इंदिरा गांधी या १५ वर्षे ३५० दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या. सर्वात कमी काळ भारताच्या पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम गुलजारीलाल नंदा यांच्या नावावर आहे. ते ११ जानेवारी १९९६ ते २४ जानेवारी १९९६ पर्यंत १३ दिवस हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यरत होते.
  • भारतात सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी हे होते. त्यावेळी त्यांचे वय ४०  होते. तर वयोवृद्ध पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई. त्यावेळी त्यांचे वय ८१ वर्षे होते.

Contact Us

    Enquire Now