मेघालयातील लुख नदीचे पुनरुज्जीवन

मेघालयातील लुख नदीचे पुनरुज्जीवन

  • दशकभरापूर्वी काेळसा खाणीतील सांडपाण्यामुळे मृतवत बनलेल्या लुख नदीच्या पुनरुज्जीवनास यश आल्याचा दावा मेघालय सरकारने केला आहे.
  • शैवाळ आणि काही वनस्पतींच्या मदतीने फायटोरेमेडिएशन (Phytoremediation) या तंत्राने नदीला स्वच्छ बनविण्यात आले आहे.

लुख नदी

  • इस्ट जैतिया हिल्स या मेघालयातील जिल्ह्यात उगम पावते.
  • हा प्रदेश कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
  • २०१२ मध्ये या नदीने प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठली होती. मेघालय प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासाठी खाणींतील आम्लयुक्त सांडपाणी तसेच तत्सम प्रदूषकांना कारणीभूत धरले होते.
  • मात्र स्वच्छता व शुद्धीकरण विषयक उपक्रमांमुळे या नदीला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात आले आहे.
  • यामध्ये शैवाल आणि काही वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे.

Contact Us

    Enquire Now