मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार – २०२१

मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार – २०२१

  • कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम पुस्तक व त्याच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • २०१४ पूर्वी हा पुरस्कार फक्त राष्ट्रकुल देशांच्या, आयरिश व दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी लिहिलेल्या अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी दिला जात होता.
  • आधी दर दोन वर्षांनी दिला जाणारा पुरस्कार आता २०१६ पासून दरवर्षी इंग्रजीत भाषांतरित व ब्रिटनमध्ये प्रकाशित एका पुस्तकाला त्याच्या लेखक व भाषांतरकारास विभागून देण्यात येतो.
  • स्थापना : २००४
  • प्रत्यक्ष सुरुवात : २००५
  • पहिले विजेते : इस्माईल कादारे (अल्बानिया)
  • स्वरूप : ५०,००० पाउंड (६७,००० डॉलर्स)
  • पुरस्कार देणारी संस्था : मॅन ग्रुप (इंग्लंड)
  • आवृत्ती : बारावी
वर्ष आवृत्ती लेखक पुस्तक अनुवादक देश
२०२१ १२ डेव्हिड डिओप अॅट नाइट ऑल ब्लड इज बॅक एना मोरकोवाकिस फ्रान्स
२०२० ११ मॅरिएक लुकास रिजनेवेल्ड द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग मिचेल हचिसन नेदरलँड
२०१९ १० जोखा अलहार्थी सेलेस्टिअल बॉडीज मॅरिलिन बुथ ओमान
२०१८ ओल्गा टोकार्झुक फ्लाईट्‌स् जेनिफर क्रॉफ्‍ट पोलंड

At Night All Blood is Back :

  • ही कादंबरी अल्फा नदियाये या पहिल्या महायुद्धात फ्रान्सकडून लढणाऱ्या सेनेगल सैनिकावर आधारित आहे.
  • २०१८मध्ये फ्रांसिसी भाषेत प्रकाशित झालेल्या या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर २०२० मध्ये प्रकाशित झाले.

डेव्हिड डिओप:

  • जन्म : १९६६ (पॅरिस)
  • इंटरनॅशनल मॅन बुकर पुरस्कार जिंकणारे पहिले फ्रेंच लेखक.
  • पाऊ विद्यापीठात १८ व्या शतकाच्या साहित्याचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
  • ‘अॅट नाइट ऑल ब्लड इज बॅक’ ही डिओप यांची दुसरी कादंबरी असून फ्रान्समधील प्रमुख १० पुरस्कारांसाठी त्यास शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.
  • ‘प्रिक्स गॉन्कोर्ट देस लायकिन्स’ तसेच ‘स्विस प्रिक्स अहमादौ कोरौमा’ हे पुरस्कार या कादंबरीस मिळाले आहेत.
  • सध्या १३ भाषांमध्ये अनुवादित केले जात असलेल्या या पुस्तकाने इटलीमधील स्ट्रेगा युरोपियन पुरस्कारही मिळविला आहे.

 

साहित्य :

 

अ) I’ Attraction Universelle (२०१२)

ब) At Night All Blood is Back (२०१८)

Contact Us

    Enquire Now