मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल (MRSAM)

मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल (MRSAM)

  • इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) च्या सहकार्याने भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल विकसित केली आहे.
  • प्रकल्पाचे नाव – जमिनीवरून हवेत मारा करणारे
  • निर्माते – डीआरडीओ (DRDO) आणि आयएआय (IAI)
  • लांबी – 4.5 मी.
  • ठिकाण – चांदीपूर (Integrated Test Range) वरून ओदिशा येथून यशस्वी चाचणी.
  • विमानसदृश हालचाली करणाऱ्या हवेतील मानवविरहित लक्ष्याचा भेद करत क्षेपणास्त्राने गुणवत्ता व अचूकता सिद्ध केली.
  • हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलांना मध्यम रेंजवर विविध प्रकारच्या हवाई धमक्यांविरुद्ध संरक्षण क्षमता प्रदान करण्यासाठी विकसित केले आहे.
  • डीआरडीओ आणि आयएआय मार्फत विकसित करून 2019मध्ये हवाई दलाकडे सोपविण्यात आले होते.

एमआरएसएएम (MRSAM) डिझाइन व वैशिष्ट्ये 

  • प्रत्येक MRSAM शस्त्र प्रणालीमध्ये एक कमांड, कंट्रोल सिस्टिम, ट्रॅकिंग रडार, मोबाईल लाँचर असतात.
  • ट्रॅकिंग रडार वापरून धमकी ओळखता येते व तिचा मागोवा घेता येतो.
  • लक्ष्याचा यशस्वी भेद करणाऱ्या अचूक आणि परिणामकारक क्षेपणास्त्राची निर्मिती केल्याने भारताचे स्थान बळकट झाले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकाससंस्था (DRDO)

  • स्थापना – 1958
  • मुख्यालय – DRDO भवन, नवी दिल्ली
  • मंत्रालय – संरक्षण मंत्रालय
  • अध्यक्ष – डॉ. सतिश रेड्डी
  • संरक्षण मंत्री – राजनाथ सिंह

मोटो (Motto) – बलस्य मूलं विज्ञानम्‌ (Strength’s Origin is in knowledge)

Contact Us

    Enquire Now