मिताली राज बनली सर्वाधिक धावा पटकावणारी महिला फलंदाज

मिताली राज बनली सर्वाधिक धावा पटकावणारी महिला फलंदाज

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात विक्रमी खेळी केली.
  • ७५ धावांची नाबाद खेळी करणारी मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा पटकावणारी महिला फलंदाज बनली आहे. सलग तीन अर्धशतके करत भारतीय महिला क्रिकेट संघाला चार विकेट्‌स्नी विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
  • सोळाव्या वर्षाच्या वयात पदार्पण करणाऱ्या मिताली राजने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त २२ वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी मिताली दुसरी खेळाडू आहे.
  • इंग्लंडच्या विरोधात खेळवण्यात आलेल्या मालिकेमध्ये मिताली राज एका वळणावर अत्यंत मजबुतीने उभी राहिली. या विजयी खेळीसह मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इंग्लंडची कर्णधार चार्लोट एडवर्डसला मागे टाकले आहे. तिच्या नावे आता १०,३३७ धावा असून ती प्रथम स्थानी आली आहे.
  • चार्लोट एडवडर्सच्या नावे १०,२७३ धावा असून ती द्वितीय स्थानावर गेली असून न्यूझीलंडची सूजी बेट्‌स ७,८४९ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
  • २२ वर्षापूर्वी होती, तशीच आजही आपली धावांची भूक कायम असून पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपच्या दृष्टीने आपल्या फलंदाजीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे, असे मितालीने सांगितले.
  • मिताली म्हणते, ज्या पद्धतीने माझा प्रवास सुरू आहे, खरेतर हा आता पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. खेळाडू आणि माणूस म्हणून अनेक आव्हानात्मक क्षणही आलेत. या आव्हानांमागे काहीतरी उद्दिष्ट असावे कारण यातूनच मी घडत गेले. माझ्या फलंदाजीबाबत म्हणाल तर आजही वाटते की सुधारणेला वाव आहे. मी त्यावर मेहनत घेत असल्याचे तिने सांगितले.
  • विक्रम मोडण्याचा सिलसिला कायम राखत मितालीने दाखवून दिले आहे की तिचा फलंदाजीचा दर्जा किती वरचा आहे. खास करून आव्हानांचा पाठलाग करताना तिची कामगिरी खूप चांगली होती. मला तर वाटते की लक्ष्याचा पाठलाग करताना तिची सरासरीही शंभरपेक्षा जास्त असावी, तिची कामगिरी असामान्य असल्याची ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार किसा स्थळेकर यांनी सांगितले.

मिताली राज थोडक्यात

  • जन्म – ३ डिसेंबर १९८२ (३८ वर्षे). जोधपूर, राजस्थान.
स्पर्धा कसोटी वन डे टी-२० क्रिकेट
मॅचेस ११ २१७ ८९
धावा ६६९ ७३०४ २३६४
१००/५० १/४ ७/५८ ०/१७
बळी

पुरस्कार

१) २००३ – अर्जुन पुरस्कार

२) २०१५ – पद्‌मश्री

३) २०१७ – Youth Sports Icon of Excellence Award

४) २०१७ – Wisden Leading Women Cricketer in the world.

Contact Us

    Enquire Now