मानव संसाधन विकास मंत्रालयाचे ‘शिक्षण मंत्रालय’ असे नामकरण

मानव संसाधन विकास मंत्रालयाचे ‘शिक्षण मंत्रालय’ असे नामकरण

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेच्या कलम ७७ अन्वये मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यास परवानगी दिली.
  • याबाबतची शिफारस २०१५ साली इस्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्वप्रथम केली होती.
  • २९ जुलै २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शिक्षण धोरणास मंजुरी दिली. त्यातील तरतुदींमध्ये या नामबदलाचा समावेश होता.
  • २८ सप्टेंबर १९८५ मध्ये आधीच्या शिक्षण मंत्रालयाचे नामबदल मानव संसाधन आणि विकास मंत्रालय असे करण्यात आले. (HRD) त्यानंतर २०२० च्या शिक्षण धोरणानुसार पुन्हा या मंत्रालयाचे नाम बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले.
  • केंद्रीय शिक्षणमंत्री – रमेश पोखरियाल ‘निशंक’
  • केंद्रीय राज्यशिक्षणमंत्री – संजय धोत्रे
  • सध्या या मंत्रालयाअंतर्गत दोन विभाग कार्यरत आहेत.
  • अ) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग
  • ब) उच्च शिक्षण विभाग

Contact Us

    Enquire Now