माजी सैनिकांना मिळकतकर माफ

माजी सैनिकांना मिळकतकर माफ

  • राज्यातील माजी सैनिक आणि दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींना मिळकतकर १००% माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • चालू आर्थिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करत असलेल्या सर्व माजी सैनिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
  • त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात असलेल्या माजी सैनिकांना यापुढे मिळकतकर भरावा लागणार नाही.
  • या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.

मिळकतकर माफीसाठी पात्रता निकष

  • माजी सैनिक हा राज्यातील रहिवासी असावा.
  • अधिवास (रहिवासी) प्रमाणपत्र सादर करावे लागणार.
  • जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अनिवार्य.
  • केवळ एकाच मिळकतीसाठी करमाफी मिळणार.
  • माजी सैनिक व त्यांची पत्नी हयात असेपर्यंत करमाफीचा लाभ मिळणार.
  • अविवाहित माजी सैनिकांना आईवडील हयात असेपर्यंतच लाभ

Contact Us

    Enquire Now