महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तिघांची नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी तिघांची नियुक्ती

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे , निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करून या सदस्यांची नियुक्ती केली.
  • सदस्यपदी नियुक्त झालेले राजीव जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव होते. त्यांनी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त म्हणूनही काम केले होते.
  • डॉ. देवानंद शिंदे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्याकडे काहीकाळ मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार होता.

राज्य लोकसेवा

  • भाग – 14 कलम 315 ते 323
  • कलम 315 अन्वये राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असेल.
  • रचना – एक अध्यक्ष + अन्य सदस्य
  • नेमणूक – राज्यपालांमार्फत
  • संख्येबाबत घटनेत कोणतीही तरतूद नाही.
  • म्हणजेच त्यांची संख्या राज्यपाल ठरवतात.

पात्रता 

  • विशेष पात्रता घटनेत सांगितली नाही, पण एकूण सदस्यांपैकी 50% सदस्य असे असावेत त्यांनी नियुक्तीच्या वेळी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारचे अधिकारपद निदान 10 वर्षे धारण केलेले असावे.
  • पदावधी – 6 वर्षे  / 62 वर्षे
  • राजीनामा – राज्यपालाकडे
  • पदावधी – संपल्यानंतर अध्यक्ष व सदस्य पुनर्नियुक्तीसाठी अपात्र (पण इतर आयोगाचे अध्यक्ष म्हणून पात्र)
  • पदावरून दूर करणे – केवळ राष्ट्रपती आदेशाद्वारे, गैरवर्तनाच्या कारणावरून दूर करता येईल, पण सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीअंती ते ठरावे लागते.

Contact Us

    Enquire Now