महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार

  • अमेरिकेत स्थायिक मराठी माणसांनी स्थान केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या पुरस्कारांचे हे 27वे वर्ष असून, आतापर्यंत 336 पुरस्कार दिले आहेत.
  • जबाबदारी – अ. महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम), ब. साधना ट्रस्ट

पुरस्कार –

अ. जीवनगौरव पुरस्कार – 

  1. दिलीप वि. चित्रे स्मृतिसाहित्य जीवनगौरव पुरस्कार – श्री. महेश एलकुंचवार (नाटककार)
  2. सामाजिक कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार – श्री. गजानन खातू

ब. डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिपुरस्कार – के. वीरमणी (चेन्नई)

क. वाङ्‌मय प्रकार पुरस्कार (विज्ञानकथा) – सुबोध जावडेकर (लेखक)

ड. ग्रंथ पुरस्कार (ललित कथा – तिसरा डोळा) – किरण येले

इ. वैचारिक अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार (पाण्याशप्पथ) – प्रदीप पुरंदरे

फ. रा. शं. दातार नाट्य पुरस्कार (तेरवं- नाटक) – श्याम पेठकर

सामाजिक पुरस्कार – 

अ. विशेष कृतज्ञता – नितीन देसाई

ब. कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार – अरुणा सबाने

क. कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार – सुधीर अनवले

ड. युवा पुरस्कार – चेतन साळवे

पुरस्कार व स्वरूप

पुरस्कार 

स्वरूप

  1. जीवनगौरव पुरस्कार
दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह
  1. विशेष कृतज्ञता पुरस्कार
एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह
  1. दाभोलकर स्मृतिपुरस्कार
  • वाङ्‌मयप्रकार पुरस्कार
  • ग्रंथ पुरस्कार
50 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह
  1. दातार नाट्यपुरस्कार
  • कार्यकर्ता पुरस्कार
  • युवा पुरस्कार
25 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह

महेश एलकुंचवार – 

  • प्रयोगशील नाटककार
  • एकांकिका – ‘सुलतान’ (1967), ‘होळी’
  • नाटके – ‘आत्मकथा’, ‘एका नटाचा मृत्यू’, ‘धर्मपुत्र, ‘गार्बो’, ‘पार्टी’, ‘युगान्त’, ‘सोनाटा
  • पुरस्कार – विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (2019),

गजानन खातू – 

  • सहकारक्षेत्र आणि चळवळीतील हाडाचे कार्यकर्ते
  • ‘मुंबई कामगार संस्थे’च्या तर्फे सुरू झालेल्या ‘अपना बाझार’ या डिपार्टमेंटल स्टोअरच्या उभारणीत महाव्यवस्थापक म्हणून मौलिक कार्य
  • सहभाग – विषमता निर्मूलन परिषद, गिरणी कामगार आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, नर्मदा बचाव आंदोलन सामाजिक कृतज्ञता निधी इ.
  • यापूर्वी महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्यासाठी कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार (2014)

Contact Us

    Enquire Now