महाराष्ट्रातील बारा गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळ दर्जासाठी युनेस्कोकडून तत्त्वत: मान्यता

महाराष्ट्रातील बारा गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळ दर्जासाठी युनेस्कोकडून तत्त्वत: मान्यता

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी, स्वराज्याची पायाभरणी झालेल्या तोरणा गडासह बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळ दर्जासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे.
  • ‘सीरिअल नॉमिनेशन ऑफ मराठा मिलिटरी आर्किटेक्चर इन महाराष्ट्र” या शीर्षकांतर्गत या प्रस्तावाला युनेस्कोकडून तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
  • बारा गडकिल्ल्यांमध्ये शिवनेरी, तोरणा, राजगड, साल्हेर-मुल्हेर, पन्हाळा, प्रतापगड, लोहगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि कुलाबा या किल्ल्यांचा समावेश आहे.
  • महाराष्ट्रातील घारापुरी लेणी, अजिंठा आणि वेरुळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, व्हिक्टोरियन आणि आर्टडेको स्थापत्य ही पाच ठिकाणे यापूर्वीच जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केली आहेत.
  • महाराष्ट्रातील एखाद्याच गडकिल्ल्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळवण्यापेक्षा गडकिल्ल्यांची शृंखला म्हणून दर्जा मिळण्यासाठी पहिल्यांदाच प्रयत्न करण्यात आला.

युनेस्को (UNESCO – United Nations Educational, Scientific and Cultural Organization)

  • स्थापना – १६ नोव्हेंबर १९४५
  • मुख्यालय – पॅरिस

जागतिक वारसा स्थळांबाबत महत्त्वाचे

  • १६७ देशातील ११२९ ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे.
  • जागतिक वारसा स्थळाची निवड होण्यासाठी प्रथम युनेस्कोच्या नामांकन मिळावे लागते.
  • १६ नोव्हेंबर १९७२, जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसाच्या संरक्षणार्थ करार स्विकारला.
  • युनेस्कोची समिती ज्या निकषांवर किंवा वैश्विक मुल्यांवर आधारित दर्जा देते, त्यांचे जतन न झाल्यास हा दर्जा काढून घेण्याचे अधिकारही समितीला आहेत.

सर्वाधिक जागतिक वारसास्थळे असणारे देश (जुलै २०१९ पर्यंत)

१) इटली (५५)

२) चीन (५५)

३) स्पेन (४८)

४) जर्मनी (४५)

५) फ्रान्स (४५)

६) भारत (३८) – भारतातील ३० स्थळ सांस्कृतिक, ७ स्थळ नैसर्गिक तर १ मिश्र स्थळ

Contact Us

    Enquire Now