महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची पाकिस्तान मध्ये पुन्हा विटंबना

महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची पाकिस्तान मध्ये पुन्हा विटंबना

  • पाकिस्तानातील लाहोर किल्ल्यामध्ये असणार्‍या शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची एका व्यक्तीद्वारे तोडफोड करण्यात आली.
  • याअगोदर सुद्धा दोन वेळेस या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.
  • सदर पुतळ्याचे अनावरण जून २०१९ मध्ये करण्यात आले होते.
  • पुतळ्याची विटंबना करणारा इसम हा पाकिस्तान मधील तेहरिक-ए-लबाईक या पक्षाचा सदस्य होता.
  • पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्र्यांनी ट्विटरवरून सदर घटनेचा निषेध केला.

महाराजा रणजीत सिंह :

  • अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणानंतर पाकिस्तानच्या पंजाब व लाहोर या भागामध्ये अफगाणांच्या वर्चस्वाखाली अराजकता माजली होती.
  • या पार्श्‍वभूमीवर  अठराव्या शतकामध्ये शीख सरदारांच्या नेतृत्वाखाली छोटी छोटी राज्ये (मिसल)उदयास आली होती.
  • अशी एकूण १२ मिसल होती.
  • त्यातील सुकरचाकिया या राज्यामध्ये १३ नोव्हेंबर १७८० ला रणजीत सिंह यांचा जन्म झाला.
  • शेर-ए-पंजाब असेसुद्धा म्हणतात.
  • लहानपणीच देवीच्या आजारपणामुळे त्यांना एक डोळा गमवावा लागला होता.
  • तरीपण त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक व प्रभावशाली होते.
  • १७९९ मध्ये लाहोरवर ताबा मिळवून विखुरलेल्या विभक्त अशा शीख राज्यांना त्यांनी एकत्र करून एक स्वतंत्र असे शीख साम्राज्य स्थापन केले.
  • महाराजा रणजीत सिंह यांनी एक कल्याणकारी राज्य स्थापले होते जे हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्येही लोकप्रिय होते.
  • पंजाबी जनतेला त्यांनी एक शांततापूर्ण राज्य दिले होते.
  • आपल्या लष्करामध्ये त्यांनी युरोपियन अधिकाऱ्यांना(मुख्यतः फ्रेंच) भरती केले होते.
  • आजचे लाहोर, मुलतान, काबुल आणि पेशावर त्यांच्या साम्राज्याचा भाग होते.
  • अमृतसर येथील हरमंदिर साहेब याच्यावर सोन्याचा मुलामा चढवून त्यांनी त्याचे सुवर्ण मंदिरामध्ये रूपांतर केले.
  • तसेच मधील हुजूर साहेब गुरुद्वाराला त्यांनी दान दिले होते.
  • १८३९ मध्ये पक्षाघाताच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले.

मोपला उठावाची शंभर वर्षे

  • २० ऑगस्टला मलबार किनाऱ्यावरील(केरळ)मोपला मुसलमानांनी ब्रिटिश व हिंदू जमीनदारांविरुद्ध केलेल्या चळवळीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.
  • दक्षिण मलबारमध्ये असणाऱ्या मुस्लिम बटाईदारांना आणि शेतकऱ्यांना ‘मोपला’ असे म्हटले जाई.
  • एकोणिसाव्या शतकात मोपल्यांच्या शेतीविषयक तक्रारी वाढल्या.
  • जास्तीचे भूमी कर,जमिनीवरून बेदखल करणे, जास्तीची मालगुजारी,पट्टेदारीबाबत अनिश्चितता जमीनदारांकडून जास्त पैशांची मागणी इत्यादींमुळे मोपला हे ब्रिटिश सरकार व जमीनदार (जे मुख्यतः हिंदू होते.) यांच्यावर नाराज होते.
  • १९२० मध्ये देशामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन तसेच अली बंधूंच्या नेतृत्वाखाली खिलाफत चळवळ सुरू होत्या.
  • मलबारमध्ये खिलाफत चळवळीचे नेतृत्व अली मुसलीयार या नेत्याने केले होते.
  • मोपल्यांनी त्याला ‘राजा’ ही पदवी देऊन बंडास सुरुवात केली.
  • २० ऑगस्ट १९२१ला तालुक्याचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट थॉमसने तिरुरांगडी येथील मशिदीत घुसून अली मुसलीयारला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मोपला बंडाची सुरुवात झाली.
  • यामध्ये अनेक युरोपियन अधिकार्‍यांना ठार मारण्यात आले, तसेच दळणवळणात अडथळे आणणे, तारा उद्ध्वस्त करणे, रेल्वेचे रूळ उखडणे,सरकारी इमारती जाळणे असे प्रकार करण्यात आले.
  • शिवाय जमीनदारांना सुद्धा ठार मारण्यात आले. बहुतांशी जमीनदार नंबुद्री आणि नायर ह्या हिंदू उच्च जातीतील होते. त्यामुळे या उठावास धार्मिक रंग प्राप्त झाला.
  • अहिंसक असणाऱ्या असहकार चळवळीपासून हे बंड बरेच दूर गेले होते.
  • ब्रिटिशांनी या प्रदेशामध्ये मार्शल कायदा लागू करून गोरखा रेजिमेंटला पाचारण केले होते.
  • १९२१च्या शेवटपर्यंत ब्रिटिशांनी हे बंड क्रूरपणे दडपून टाकले होते.
  • ब्रिटिशांविरुद्ध दक्षिण भारतात झालेल्या बंडांपैकी मोपला बंड हे असे पहिलेच बंड होते.
  • इतर प्रमुख नेते : याकूब हसन, यू. गोपाळ मेनन,मोईनुद्दीन कोमा, के. माधवन नायर

Contact Us

    Enquire Now