मल्लिकार्जुन खर्गे- राज्यसभाविरोधी पक्ष नेते

मल्लिकार्जुन खर्गे- राज्यसभाविरोधी पक्ष नेते-

  • गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाल १ फेब्रुवारीला संपल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षनेते बनण्याच्या तयारीत आहे.
  • विरोधी पक्ष नेताहा सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या कमीत कमी १/१० (पेक्षा जास्तच) सदस्य असणाऱ्या पक्षाचा नेता असतो.
  • या पदाची संसदीय कायद्यामध्ये तरतूद आहे.
  • १९६९ मध्ये या पदास मान्यता मिळाली.
  • १९७७ मध्ये या पदाची वैधानिक दर्जा मिळून या पदाचा दर्जा कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबर झाला.
  • वैधानिक दर्जा मिळाल्यानंतरचे विरोधी पक्षनेते-यशवंतराव चव्हाण (INC).
  • विरोधी पक्षांनी त्याला पर्यायी पंतप्रधान असे संबोधले जाते कारण चालू सरकार पडल्यास त्याजागी नवीन सरकार उभे करण्याची ताकद त्यात असते.
  • उत्तरदायित्व आणि पारदर्शकता असलेल्या संस्थांमधील नेमणुका करण्यामध्येही विरोधी पक्षनेता चा सहभाग असतो.उदा. लोक लेखा समिती, केंद्रीय अन्वेषण विभाग,लोकपाल, केंद्रीय दक्षता आयोग इत्यादी.
  • सर्वप्रथम राज्यसभा विरोधी पक्ष नेते- श्यामनंदन प्रसाद मिश्रा (१९६९-७१ INC-O)
  • सध्या लोकसभा मध्ये विरोधी पक्ष नेत्याची जागा रिक्त आहे.

Contact Us

    Enquire Now