मल्लखांबसहित गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या खेळांना अधिकृत मान्यता.

मल्लखांबसहित गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या खेळांना अधिकृत मान्यता.

  • क्रीडा मंत्रालयाने मल्लखांब, गटका, कलरीपायूट्टू आणि थांत-ता या स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली.
  • हरयाणा येथे पुढील वर्षी होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही समावेश असेल.

महत्त्वाचे मुद्दे – 

  • खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ह्या क्रीडा विकासाच्या सुधारित राष्ट्रीय कार्यक्रम ‘खेलो इंडिया’चा भाग असून 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजूर केले आहे.
  • दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 1000 सहभागींना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी 8 वर्षांकरिता 500.000रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
  • देशभरातील खेळांना प्रोत्साहित करणे हेच ‘खेलो इंडिया’ योजनेचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे लोकसंख्या त्याच्या क्रॉस कटिंग प्रभावातून खेळाची ताकद वाढवू शकेल, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
  • मुले आणि तरुणांचा समग्र विकास
  • समुदाय विकास
  • सामाजिक एकत्रिकरण
  • लिंग समानता
  • निरोगी जीवनशैली
  • राष्ट्रीय अभिमान
  • क्रीडा विकासाशी संबंधित आर्थिक संधी

 

  • खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 मधील समाविष्ट खेळ – 
  1. ॲथलेटिक्स
  2. तिरंदाजी
  3. बास्केटबॉल
  4. बॉक्सिंग
  5. बॅडमिंटन
  6. सायकलिंग
  • बुद्धिबळ
  • फुटबॉल
  • जिम्नॅस्टिक
  • हॉकी
  • हँडबॉल
  • जुडो
  • कराटे
  • खो-खो
  • कबड्डी
  • नेमबाजी
  • जलतरण
  • टेबलटेनिस
  • तायक्वांदो
  • टेनिस
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • कुस्ती
  • वुशू

नव्याने समाविष्ट केलेले खेळ – 

अ. मल्लखांब – कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतींचे प्रकार करीत असल्याने त्यास हे नाव पडले.

  • दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे व्यायाम शिक्षक बाळंभटदादा देवधर (1780-1852) यांनी मल्लखांबविद्येचे पुनरुज्जीवन केले.
  • महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तरप्रदेश, तमिळनाडू इ. राज्यांत खेळला जातो.

ब. गटका – पंजाब राज्यात खेळला जातो.

  • निहांग शीख योद्ध्यांची ही पारंपरिक लढाई शैली स्वरक्षण तसेच खेळ म्हणूनही वापरली जाते.
  • 6वे शिख गुरू हरगोविंद यांनी मुघल काळात स्वत:च्या बचावासाठी किर्पण (kirpan) स्वीकारला तेव्हा हा गट अस्तित्वात आला असे मानले जाते.

क. कलरीपायट्टू – तमिळ संगम साहित्यात कालारी हा शब्द रणांगण आणि युद्धक्षेत्र या दोन्ही गोष्टींचे वर्णन करण्यासाठी आढळतो.

  • भारतीय मार्शल आर्टचा प्रकार जो प्रामुख्याने केरळमध्ये खेळला जातो.

ड. थांग – ता – हुयेन लँगलॉन या मणिपुरी मार्शल आर्टवर आधारित.

  • यात थांग – ता म्हणजे सशस्त्र लढाई ज्यात तलवार (थांग) व भाला (ता) यांचा समावेश होतो.

खेलो इंडिया युवा स्पर्धा

 

आवृत्ती वर्ष यजमान (राज्य) सर्वाधिक पदके मिळवणारे राज्य
I 2018 दिल्ली हरियाणा
II 2019 पुणे (महाराष्ट्र) महाराष्ट्र
III 2020 गुवाहाटी (आसाम) महाराष्ट्र
IV 2021 हरियाणा (आयोजित)

Contact Us

    Enquire Now